Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 6 September 2026, 19:58

पुणे: एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षेबाबत विविध मागण्या मांडल्या. यावेळी आयोगातील किंवा आयोगाबाहेरील कोणत्याही व्यक्तीचा पेपरफुटीच्या गैरप्रकारात सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून आतापर्यंत सहापेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली असून तपास वेगाने सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. या समितीत यूपीएससीचे माजी सदस्य, पोलिस महासंचालक, आयआयटीचे प्राध्यापक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीचा शासन आदेशही जारी करण्यात आला आहे.

ही समिती राज्यातील विविध विभागांना भेट देऊन स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, याबाबत त्यांच्याकडून सूचना घेतल्या जाणार आहेत. पुण्यातही समितीकडून भेट देऊन विद्यार्थी आणि संबंधितांशी चर्चा केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

या भेटीवेळी शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे तसेच विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून कठोर कायदे आणि उपाययोजना करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा घेण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत आवश्यक बदल करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी संबंधित सर्व घटकांना विश्वासात घेऊन सुधारणा करण्यात येतील.

स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीच्या तपासातून आयोगातील किंवा बाहेरील कोणत्याही व्यक्तीचा सहभाग समोर आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp