Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोलवडी येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेल्टने मारहाण; लोणीकंद पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 13 July 2026, 13:05

थेऊर, (पुणे) : चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पतीने पत्नीवर लोखंडी हुकच्या बेल्टने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. कोलवडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत ही घटना घडली. या हल्ल्यात पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पतीविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 10) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. सागर राजू ऊर्फ राजेंद्र भालसिंग (वय-32, रा. कोलवडी, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा प्रेमविवाह झाला असून पती सागर भालसिंग हा कोणताही व्यवसाय करत नसून दारूच्या व्यसनाधीन आहे. लग्नानंतरपासून तो सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. मात्र प्रेमविवाहामुळे आणि पतीमध्ये सुधारणा होईल या अपेक्षेने त्यांनी यापूर्वी तक्रार केली नव्हती.

शुक्रवारी (ता. 10) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पतीने पुन्हा चारित्र्यावर संशय घेत पत्नीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी त्या घराबाहेर पळाल्यानंतर आरोपीने लोखंडी कोयता घेऊन पाठलाग केला. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या हातातून कोयता काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

 

यानंतर पीडिता दिराच्या घरी गेल्यानंतरही आरोपी तेथे पोहोचला. त्याने कमरेचा बेल्ट काढून लोखंडी हुक असलेल्या बाजूने डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. त्यावेळी नातेवाईकांनी हस्तक्षेप करून तिला आरोपीच्या तावडीतून सोडवले.

दरम्यान, जखमी महिलेवर प्रथम खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उपचारानंतर महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पासपोर्ट हातात मिळायला थेट ‘ऑक्टोबर’ उजाडणार! पुणेकरांना अपॉइंटमेंटसाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

Monday, 27 July 2026, 16:13

‘डाळिंब बन’ येथे ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली 160 ग्रामदूतांनी घडवले स्वच्छतेचे दर्शन; अवघ्या अडीच तासांत 6 टन कचऱ्याची विल्हेवाट..

Monday, 27 July 2026, 16:02

श्री क्षेत्र डाळिंब बन येथे विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाची दुचाकी चोरीला; उरुळी कांचन पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 27 July 2026, 15:43

पुण्यात थरार! हातात चाकू, मनात राग अन् पुण्याच्या रस्त्यावर दहशत; महिलेने प्रश्न विचारल्यावर फाडफाड इंग्लिश बोलला अन्…

Monday, 27 July 2026, 15:34

MPSCच्या पेपरसाठी १२ लाखांचा सौदा! एका PDF फाइलमुळे फुटलं बिंग; रोहित पवारांचा मोठा खुलासा…

Monday, 27 July 2026, 14:55

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयातही जडतोय गुडघेदुखीचा आजार; ‘हे’ सोपे उपाय ठरतील गुणकारी

Monday, 27 July 2026, 14:39
Next Post

बेकायदेशीर जमीन फेरफारप्रकरणी इंदापूरचे तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील निलंबित; जमीन महसूल संहितेचा गैरवापर केल्याचा ठपका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.