उरुळी कांचन, (पुणे) : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र डाळिंब बन येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असल्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी लांबवली.

याबाबत विलास लक्ष्मण चोरमले (वय 32, व्यवसाय- शेती, रा. थोरात मळा, वाळकी, ता. दौंड) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विलास चोरमले हे 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशीनिमित्त कुटुंबासह श्री क्षेत्र डाळिंब बन येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून आले होते. मुख्य रस्त्यावर भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने, त्यांनी आपली गाडी स्प्लेंडर (MH 42 BH 7016) शिंदवणे हद्दीतिल मशिरूम कंपनीजवळ असलेल्या चिकूच्या झाडाखाली पार्क केली होती.
दर्शन घेऊन सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास परत आले असता, त्यांनी पार्क केलेल्या जागी दुचाकी दिसून आली नाही. परिसरात आणि आजूबाजूला शोध घेतला असता गाडी मिळून आली नाही. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास तपास पोलीस हवालदार सोमनाथ चितारे करीत आहेत.






