Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगाव येथे ट्रॅक्टर काढण्यासाठी दोरी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून 60 वर्षीय महिलेवर कोयत्याने हल्ला; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 27 July 2026, 16:53

यवत, (पुणे) : ट्रॅक्टर काढण्यासाठी दोरी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून मजुराने 60 वर्षीय महिलेवर उसाच्या कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. तर मध्यस्थी करायला आलेल्या 80 वर्षांच्या वृद्ध आईलाही मारहाण करून तिचा हात फ्रॅक्चर केला आहे. केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत ह्द्दीतील पाटील निंबाळकरवस्ती येथे शनिवारी (ता. 25) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घडली.

ज्ञानेश्वर उर्फ माऊली देवीदास राऊत (रा. काटेपिंपळगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर मंगल साधू मेमाणे (वय-60, रा. पाटील निंबाळकर वस्ती, केडगाव, ता. दौंड) असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मेमाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी राऊत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगल मेमाणे या त्यांची आई ध्रुपदाबाई यांच्यासोबत पाटील निंबाळकर वस्ती येथे राहतात.शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दोघी माय-लेकी घरात असताना, गावातील सोपान राऊत यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करणारा ज्ञानेश्वर उर्फ माऊली राऊत हा त्यांच्या घरासमोर आला.
​
त्याने पिण्यासाठी पाणी मागितल्याने मंगल यांनी त्याला घरातून पाणी आणून दिले. पाणी प्यायल्यानंतर आरोपीने, “माझा ट्रॅक्टर अडकला आहे, तो बाहेर काढण्यासाठी दोन दोऱ्या द्या,” अशी मागणी केली. यावेळी मेमाणे यांनी “माझ्याकडे दोऱ्या नाहीत,” असे सांगताच आरोपीने हातात असलेला उसाचा धारदार लोखंडी कोयता थेट मंगल यांच्या डोक्यात मारला.

 

मंगल यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी कोयता हाताने पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तो हिसकावून पुन्हा त्यांच्या डोक्यात जोरदार वार केला. डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला. आरडाओरड्याने 80 वर्षांच्या वृद्ध आई ध्रुपदाबाई मेमाणे या मुलीला वाचवण्यासाठी घराबाहेर आल्या. आरोपीने त्यांच्यावरही कोयत्याने वार करत हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध आईच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन हात पार फ्रॅक्चर झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

​दरम्यान, या मारहाणीचा आवाज आणि गोंधळ ऐकून शेजारीच राहणारे मंगल यांचे भाऊ धोंडीबा मेमाणे हे तात्काळ घटनास्थळाकडे धावत आले. धोंडीबा यांना समोरून येताना पाहून आरोपी ज्ञानेश्वर राऊत याने कोयता तिथेच टाकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सध्या दोघींवर केडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचनमध्ये ‘त्या’ तीन चोरांचा धुमाकूळ! आठ दिवसांत चार दुकानफोड्या, कॅडबरी चॉकलेट्सह लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास; पोलिसांची गस्त नावालाच?

Monday, 27 July 2026, 17:02

नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेला! नातजावयाचं डोकं सटकलं; भाकरी करणाऱ्या आजीसासूवर पेट्रोल फेकलं अन् घडलं भयंकर…

Monday, 27 July 2026, 16:56

केडगाव येथे ट्रॅक्टर काढण्यासाठी दोरी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून 60 वर्षीय महिलेवर कोयत्याने हल्ला; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Monday, 27 July 2026, 16:53

पासपोर्ट हातात मिळायला थेट ‘ऑक्टोबर’ उजाडणार! पुणेकरांना अपॉइंटमेंटसाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

Monday, 27 July 2026, 16:13

‘डाळिंब बन’ येथे ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली 160 ग्रामदूतांनी घडवले स्वच्छतेचे दर्शन; अवघ्या अडीच तासांत 6 टन कचऱ्याची विल्हेवाट..

Monday, 27 July 2026, 16:02

श्री क्षेत्र डाळिंब बन येथे विठ्ठलाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाची दुचाकी चोरीला; उरुळी कांचन पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 27 July 2026, 15:43
Next Post

नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेला! नातजावयाचं डोकं सटकलं; भाकरी करणाऱ्या आजीसासूवर पेट्रोल फेकलं अन् घडलं भयंकर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.