Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेला! नातजावयाचं डोकं सटकलं; भाकरी करणाऱ्या आजीसासूवर पेट्रोल फेकलं अन् घडलं भयंकर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 27 July 2026, 16:56

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात कौटुंबिक वादातून धक्कादायक प्रकार घडला आहे. पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून एका तरुणाने स्वतःच्या आजीसासूवर पेट्रोल फेकल्याने त्या गंभीररीत्या भाजल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

जखमी महिलेचे नाव सुलोचना पुंडलिक कदम (वय ६५) असे आहे. त्यांच्यावर गंभीर भाजल्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नातजावई गुरुनाथ शशिकांत शिंदे (वय ३१, रा. चिंचेवाडी, ता. गडहिंग्लज) याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुनाथ हा पत्नी प्रीती आणि त्यांच्या एका वर्षाच्या मुलासह चिंचेवाडी येथे राहत होता. पती-पत्नीमध्ये काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून वाद होत होते. त्यानंतर प्रीती आपल्या मुलासह आजीसासू सुलोचना कदम यांच्या हसूरसासगिरी येथील घरी राहण्यासाठी गेली होती. पत्नीला परत पाठवावे, यासाठी गुरुनाथ वारंवार फोन करत होता. मात्र, ती परत न आल्याने त्याने थेट सासर गाठले.

 

पत्नी माहेरीच राहण्यामागे सुलोचना कदम यांचाच हात असल्याचा संशय त्याने मनात धरला होता. त्यामुळे तो घरातून निघतानाच एका बाटलीत पेट्रोल घेऊन गेल्याचे तपासात समोर आले आहे. सकाळी सुमारे दहा वाजता तो हसूरसासगिरी येथील घरी पोहोचला आणि सुलोचना कदम यांच्याशी वाद घालू लागला.

त्यावेळी सुलोचना या चुलीसमोर भाकरी करत होत्या. वाद वाढताच संतापाच्या भरात गुरुनाथने त्यांच्या दिशेने पेट्रोल फेकले. चुलीतील आगीच्या संपर्कात येताच अचानक मोठा भडका उडाला आणि सुलोचना कदम यांना आगीने वेढले. या घटनेत त्यांच्या चेहऱ्यासह मान आणि शरीराचे इतर भाग मिळून सुमारे ४५ टक्के भाजले.

घटनेनंतर त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शी.. कित्ती गचाळ! सोया चापच्या बॅटरमध्ये लोळतोय अर्धनग्न कामगार; पहा व्हायरल Video

Monday, 27 July 2026, 17:31

उरुळी कांचनमध्ये ‘त्या’ तीन चोरांचा धुमाकूळ! आठ दिवसांत चार दुकानफोड्या, कॅडबरी चॉकलेट्सह लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास; पोलिसांची गस्त नावालाच?

Monday, 27 July 2026, 17:02

नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेला! नातजावयाचं डोकं सटकलं; भाकरी करणाऱ्या आजीसासूवर पेट्रोल फेकलं अन् घडलं भयंकर…

Monday, 27 July 2026, 16:56

केडगाव येथे ट्रॅक्टर काढण्यासाठी दोरी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून 60 वर्षीय महिलेवर कोयत्याने हल्ला; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Monday, 27 July 2026, 16:53

पासपोर्ट हातात मिळायला थेट ‘ऑक्टोबर’ उजाडणार! पुणेकरांना अपॉइंटमेंटसाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

Monday, 27 July 2026, 16:13

‘डाळिंब बन’ येथे ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली 160 ग्रामदूतांनी घडवले स्वच्छतेचे दर्शन; अवघ्या अडीच तासांत 6 टन कचऱ्याची विल्हेवाट..

Monday, 27 July 2026, 16:02
Next Post

उरुळी कांचनमध्ये 'त्या' तीन चोरांचा धुमाकूळ! आठ दिवसांत चार दुकानफोड्या, कॅडबरी चॉकलेट्सह लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास; पोलिसांची गस्त नावालाच?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.