Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 25 October 2026, 20:02

बारामती : शेतातील मातीचा भराव सुरू ठेवण्यासाठी आणि कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. जहीर सिराज शेख (वय ४७) असे ताब्यात घेतलेल्या वनपालाचे नाव आहे. २५ ऑक्टोबर रोजी माळेगाव येथे ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून उर्वरित ६ हजार रुपये स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.

तक्रारदार हे ६० वर्षीय शेतकरी असून, त्यांची कोऱ्हाळे खुर्द येथे चार हेक्टर शेतजमीन आहे. पावसामुळे शेतातील माती नीरा नदीत वाहून गेल्याने ते नदीपात्रातील माती शेतात टाकत होते. या कामादरम्यान २६ सप्टेंबर रोजी वनपाल जहीर शेख यांनी काम बंद करण्यास सांगितले. संबंधित जागा वनविभागाच्या मालकीची असल्याचे सांगून कारवाई करण्याची भीती दाखवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

काम सुरू ठेवण्यासाठी आणि कारवाई न करण्यासाठी शेख यांनी स्वतःसाठी तसेच त्यांच्या सहकारी महिला कर्मचाऱ्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली. त्यापैकी चार हजार रुपये त्याच दिवशी स्वीकारल्याचा आरोप आहे. उर्वरित सहा हजार रुपये दिल्याशिवाय काम सुरू करू नये, असे सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीच्या आधारे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ ऑक्टोबर रोजी लाच मागणीची पडताळणी केली. या कारवाईदरम्यान पंचांसमक्ष शेख यांनी यापूर्वी चार हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित सहा हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती विभागाने दिली.

२५ ऑक्टोबर रोजी माळेगाव येथील आयटीआयसमोरील हॉटेल शिवकृपा येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारताना दुपारी २.१७ वाजता शेख यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ अन्वये माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने नमूद केले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली पथकाने काम केले. लाच मागणी किंवा भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

जुन्या भांडणाचा राग अन् त्याने 46 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर केले वार; धनकवडी येथील घटना

Monday, 26 October 2026, 9:31

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49
Next Post

पुण्यात 'भाईगिरी'चा खळबळजनक प्रकार! 'आज याला जिवंत सोडायचे नाही' म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp