Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन मृतदेह विटंबना प्रकरणात चूक नेमकी कोणाची? खाकीची की पांढऱ्या कोटाची?

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 13 June 2026, 13:34

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील सरकारी रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात मृतदेहाला लाल मुंग्या लागल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असतानाच, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. मृतदेहाच्या कथित विटंबनेसाठी रुग्णालय प्रशासन नव्हे, तर पोलिसांच्या दिरंगाईमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप हवेली तालुका आरोग्य अधिकारी सुरेश गोरे यांनी केला आहे.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील मनीष शांताराम कांचन (वय 40, रा. कुंभार आळी, उरुळी कांचन) यांनी शुक्रवारी (ता. 12) रात्री साडेअकराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर नातेवाईकांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्राथमिक तयारी पूर्ण केल्याचे सांगितले जात असताना, शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रक्रियेला विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू झाली नाही. रात्र उलटून सकाळ झाली, तरी मृतदेह तसाच पडून राहिला. अखेर संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदन कक्षात जाऊन पाहणी केली असता मृतदेहाच्या डोळ्यांवर, तोंडावर आणि जखमांवर लाल मुंग्या लागल्याचे दृश्य दिसून आले. या प्रकारामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

 

दरम्यान, हवेली तालुका आरोग्य अधिकारी सुरेश गोरे यांनी वेगळी बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची माहिती रात्रीच मिळाली होती. मात्र, शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेला पोलिसांचा अधिकृत पंचनामा उरुळी कांचन पोलिसांकडून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रुग्णालयाला प्राप्त झाला नाही. त्यामुळे जवळपास नऊ तास शवविच्छेदन प्रक्रिया रखडून राहिली.

“पोलिसांच्या अधिकृत पंचनाम्याशिवाय डॉक्टरांना शवविच्छेदन करता येत नाही. त्यामुळे पंचनामा उपलब्ध होईपर्यंत वैद्यकीय अधिकारी कायदेशीरदृष्ट्या प्रतीक्षा करण्यास बांधील असतात. त्यामुळे मृतदेह रात्रभर शवविच्छेदन कक्षात ठेवावा लागला,” असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आत्महत्येची माहिती पोलिसांना तातडीने दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यानंतर पंचनामा तयार करण्यात एवढा विलंब का झाला, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी संबंधित महिला डॉक्टर वेळेवर रुग्णालयात पोहोचल्या नाहीत, तसेच मृतदेहाचे कपडे काढून ठेवण्यास सांगून त्या अनुपस्थित राहिल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस तसेच उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार वारंवार फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद न दिल्याने त्यांची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.

चूक नेमकी कोणाची? खाकीची की पांढऱ्या कोटाची?

एकीकडे नातेवाईकांनी महिला डॉक्टर वेळेवर आल्या नसल्याचा आणि मृतदेहाचे कपडे काढून ठेवण्यास सांगून अनुपस्थित राहिल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभागाने पोलिसांच्या ढिसाळ कारभाराकडे बोट दाखवले आहे. या दोन शासकीय विभागांतील समन्वयाच्या अभावामुळे अखेर एका मृत व्यक्तीच्या पार्थिवाची अशी दुर्दैवी अवस्था झाली, हे मात्र निर्विवाद आहे. आता या संवेदनशील प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा आरोग्य प्रशासन कोणती भूमिका घेणार? दोषी पोलिसांवर आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण हवेली तालुक्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.