Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर…

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 June 2026, 14:01

लोणी काळभोर, ता.12 : आगामी काळात होणाऱ्या लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रभाग आरक्षण आज ठरविण्यात आले. काहीच्या मनाप्रमाने तर काहींच्या मनाविरुद्ध आरक्षण पडल्याने “कही खुशी कही गम” असे वातावरण होते.

ग्रामपंचायतीच्या सभागृहात शांततेत पार पडलेले हे आरक्षण अध्यासी अधिकारी तथा हवेली पंचायत समितीतील विस्तार आधिकारी एम पी वाघमारे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर केले. त्यांना गावकामगार तलाठी अभिमन्यू करे, लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी एस एन गवारी यांनी मदत केली. आरक्षणा संदर्भात उपस्थितांपैकी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, ग्राहक संरक्षण समितीचे सुर्यकांत गवळी, शिवसेनेचे संतोष भोसले, शिवाजी काळभोर आदींनी अनेक शंका विचारल्या. अध्यासी अधिकारी एम पी वाघमारे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांवर बोट ठेवून सर्व शंकांचे निरसन केले.

लोणी काळभोर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा प्रभागातील १७ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या सहा प्रभागातून १७ सदस्य निवडून द्यायचे असून, यात दहा महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. या आरक्षणात ११ जागा या खुल्या वर्गासाठी असून यामध्ये ५ पुरुष व ६ महिला खुल्या गटासाठी आहेत. अनुसूचित जाती सदस्यांच्या २ जागां पैकी १ पुरुष व १ महिला अशी विभागणी करण्यात आली आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गात १ पुरुष व ३ महिला असे ४ जण या प्रवर्गातून निवडून येणार आहेत. प्रत्येक प्रभागात सर्वसाधारण गटासाठी किमान एक जागा असल्याने या आरक्षणात निवडणूक लढवणारे उमेदवार यावेळी आनंदी झाल्याचे दिसले.

 

प्रभाग निहाय पडलेले आरक्षण पुढीलप्रमाणे –

*प्रभाग क्रमांक – १ – बाजारमळा,पाषाणकर बाग (३ जागा)
अनुसुचित जाती महिला,
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक – २ – फुले नगर, राहिंज वस्ती, माळी मळा.(३ जागा)
नागरीकाचा मागास प्रवर्ग महिला,
सर्वसाधारण महिला
सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक – ३ – गावठाण, जुने अंबरनाथ मंदिर परीसर (३ जागा)
नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण महिला,
सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक ४ – अंबरनाथ मंदिर, गणपती मंदिर (२ जागा)
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
सर्वसाधारण महिला

*प्रभाग क्रमांक ५ – रायवाडी (३ जागा)
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
सर्वसाधारण महिला,
सर्वसाधारण

*प्रभाग क्रमांक ६ – तरवडी,सिद्राममळा.(३ जागा)
अनुसुचित जाती पुरूष
सर्वसाधारण महिला,
सर्वसाधारण

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, जिल्हा परिषद सदस्या शीतल कांबळे, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती युगंधर काळभोर, पंचायत समिती सदस्य अमोल टेकाळे, प्रशासक सरपंच नागेश काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर, भोलेनाथ शेलार, राजाराम काळभोर, राहुल काळभोर, भरत काळभोर, योगेश काळभोर, माधुरी काळभोर, सविता लांडगे, माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, संगीता काळभोर, भारती काळभोर, प्रियांका काळभोर, सुर्यकांत गवळी, प्रताप बोरकर, रमेश भोसले, विठ्ठल काळभोर, यांच्या समवेत सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post

रांजणगाव एमआयडीसी मधील औषध कंपनीला २५ लाखांची खंडणीची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.