Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव एमआयडीसी मधील औषध कंपनीला २५ लाखांची खंडणीची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 June 2026, 14:10

ओमकार भोरडे

रांजणगाव, ता.12: रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी विरोधातील कथित गैरप्रकारांची माहिती उघड करण्याची धमकी देत तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विजय अनिरुध्द साबळे, रा. फ्लॅट नं. १०९, मैत्री गोल्ड सोसा., शिक्रापुर, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. आंभोळ, जांभुळदरा, ता. अकोले, जि. आहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरुन अॅड. मयुर देवराम नरवडे याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी येथील मुरली कृष्णा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या औषध निर्मिती कंपनीच्या विविध ई-मेल आयडींवर १ आणि २ जून रोजी काही गंभीर आरोप करणारे ई-मेल पाठविण्यात आले होते. कंपनीची औषधे निकृष्ट दर्जाची असल्याचा, कोल्ड स्टोरेज आणि प्रोसेसिंग विभागात तापमानाचे निकष पाळले जात नसल्याचा, कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचा तसेच गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेत अनियमितता असल्याचा दावा त्या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते, असेही नमूद करण्यात आले होते.

 

सदर ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर (HR) विजय साबळे यांनी संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीने स्वतःची ओळख मयुर नरवडे अशी करुन दिली. त्यानंतर गणेगाव रोडवरील कार्यालयात झालेल्या भेटीत कंपनीच्या कथित गैरप्रकारांबाबत पुरावे असल्याचा दावा करत कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशी थेट चर्चा करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर शिरूर येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत खरा धक्कादायक प्रकार उघड झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

बैठकीदरम्यान कंपनीच्या वार्षिक उलाढालीच्या पाच टक्के म्हणजेच सुमारे ७.५ कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ती मागणी अवास्तव असल्याचे सांगितल्यानंतर तडजोडीअंती २५ लाख रुपये देण्याची अट घालण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हि “रक्कम दिली नाही तर कंपनीतील कथित गैरप्रकारांचे पुरावे संबंधित शासकीय यंत्रणांकडे देऊन कारवाई घडवून आणू,” अशी धमकीही देण्यात आली. याशिवाय व्हॉट्सअप कॉलद्वारे “आता माझ्या हातातून बाण सुटला आहे” अशा शब्दांत दबाव टाकल्याचाही आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.

दरम्यान, या संपुर्ण घटनाक्रमाचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केल्याचा दावा करण्यात आला असून ते पुरावे पोलिसांकडे पेन ड्राइव्हद्वारे सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे रांजणगाव एमआयडीसीसह (Ranjangaon MIDC) औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. रांजणगाव MIDC पोलीसांनी फिर्याद नोंदवून तपास सुरु केला असून खंडणी, धमकी आणि संबंधित इतर कलमांनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post

'माझं लग्न जमत नाही, मला आयुष्य संपवायचंय' नैराश्यातून पुण्यातल्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.