Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन पोलिसांची अब्रू वेशीवर! महिलांचा थेट पोलीस ठाण्यातच ‘हाय-व्होल्टेज’ राडा; पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल कारवाई करणार का?

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 10 August 2026, 14:34

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही, असा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बेकायदा सावकारी आणि छळाप्रकरणी तक्रार नोंदवण्याचे काम सुरू असतानाच आरोपींच्या समर्थनार्थ आलेल्या महिलांनी थेट पोलीस ठाण्यात घुसून ‘हाय-व्होल्टेज’ राडा घातला. पोलिसांच्या देखतच हा गोंधळ आणि हुज्जत सुरू असल्याने उरुळी कांचन पोलिसांच्या नाकर्तेपणाची आणि ढिम्म कारभाराची आब्रू वेशीवर टांगली गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका पीडित महिलेने 3 लाख 14 हजार रुपयांच्या कर्जापोटी तब्बल 10 लाख 84 हजार रुपये परत केले होते. तरीही सावकारांची हाव मिटली नव्हती आणि ते आणखी पैशांसाठी या महिलेला सतत धमकावत होते. या त्रासाला कंटाळून पीडित महिला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचली.

मात्र, कायद्याचे राज्य असलेल्या पोलीस ठाण्यातच आरोपींच्या समर्थक महिलांनी धुमाकूळ घातला. पोलिसांच्या उपस्थितीतच तक्रारदार महिलेवर दबाव आणण्याचा आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संपूर्ण राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून उरुळी कांचन पोलिसांची पुरती नाचक्की झाली आहे.

पोलीस ठाण्यात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना, पोलीस मात्र हतबल प्रेक्षक बनल्याचे चित्र होते. अशा वेळी सामाजिक कार्यकर्त्या एका महिलेने धैर्याने पुढे येत तक्रारदार महिलेला धीर दिला. आरोपी समर्थकांचा सर्व दबाव झुगारून लावत त्यांनी पीडित महिलेची तक्रार नोंदवून घेण्यासाठी मदत केली.

 

“जर कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक असलेल्या पोलिसांच्या नाकाखाली, थेट पोलीस ठाण्यात घुसून गुन्हेगारांचे समर्थक असा धिंगाणा घालत असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायला जायचे कोणाकडे? उरुळी कांचन पोलिसांचा गुन्हेगारांवर काडीचाही धाक उरलेला नाही का?” असा सवाल नागरिक करू लागले आहेत.

याबाबत उरुळी कांचनच्या पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे त्यांनी फोन न उचलल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.

दरम्यान, या घटनेचे पडसाद आता संपूर्ण पुणे जिल्ह्यात उमटू लागले असून उरुळी कांचन पोलिसांच्या भोंगळ कारभारावर जोरदार टीका होत आहे. चक्क पोलीस ठाण्यातच कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल हे या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील हलगर्जी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केएसबी चौकातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; 8 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू!

Sunday, 11 October 2026, 13:52

पुण्यात गुंडगिरीचा थरार! पोलिसांत तक्रार द्यायला निघालेल्या तरुणाला रस्त्यात गाठलं, कोयत्याने सपासप वार…

Sunday, 11 October 2026, 13:33

थाटामाटात लग्न, तिसऱ्याच दिवशी नववधूचा भयंकर डाव!अख्ख्या सासरच्या कुटुंबालाच विष पाजलं?

Sunday, 11 October 2026, 12:29

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल! 22 अन् 24 कॅरेटचे आजचे भाव जाणून घ्या …..

Sunday, 11 October 2026, 12:12

धावत्या ॲम्ब्युलन्समध्ये नेमकं काय घडलं? रुग्ण थेट रस्त्यावर फेकला गेला; पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाहिका चालकाचा बेजबाबदारपणा

Sunday, 11 October 2026, 11:36

“साहेब, मीच आईला संपवलं!” IT इंजिनिअर मुलाचं भयंकर कृत्य; हत्या केल्यानंतरही तुषार मृतदेहाशेजारी बसून!

Sunday, 11 October 2026, 10:56
Next Post

भाजप आमदाराच्या ड्रायव्हरलाच दिली सुपारी! 'आम्ही पैसे देतो, तू गोळ्या झाड' म्हणत ऑफर दिली; राजकीय वर्तुळात खळबळ.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp