Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पहाटेपर्यंत धिंगाणा! डान्स पार्ट्या, DJचा कर्कश्य आवाज अन् दारूच्या नशेत तर्राट तरुण-तरुणी; पोलिसांनी अचानक धड टाकली अन्

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 August 2026, 9:13

पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात हॉटेलचा कोणताही परवाना नसताना पहाटेपर्यंत संगीत पार्टी आयोजित करून मद्यविक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. एअरपोर्ट रोडवरील बॅक बेंचर्स हॉटेलमध्ये २४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारपर्यंत मोठ्या आवाजात संगीत सुरू होते. यावेळी सहा तरुणींसह सुमारे ३० तरुण मद्यपान करून नाचत असल्याचे पोलिसांना आढळून आले.

या प्रकरणी हॉटेल मालक नितीन दिवाकर जाधव, युवराज प्रमोद नायडू, मॅनेजर दीपक रामचंद्र कांबळे यांच्यासह हॉटेलमधील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नुकर टेबलचा व्यवसाय करण्यासाठी असलेल्या ठिकाणी पार्टी आयोजित करून बेकायदेशीरपणे मद्यपुरवठा करण्यात आल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.

विमाननगर पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना बॅक बेंचर्स हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासह पहाटे साडेचारच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकण्यात आला.

पोलिसांना हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात स्पीकर सुरू असल्याचे आणि काही पुरुष व महिला नाचत असल्याचे आढळले. चौकशी केली असता हॉटेल मालकाकडे हॉटेल चालवण्याचा तसेच मद्यविक्री आणि ग्राहकांना मद्य पुरवण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.

 

कारवाईदरम्यान पोलिसांनी उपस्थित असलेल्या २४ पुरुषांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवले. तसेच सहा तरुणींची वाहतूक पोलिसांकडील ब्रेथ अॅनालायझरच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी हॉटेलमधून ७ हजार ६९० रुपयांच्या मद्याच्या बाटल्या, इतर साहित्य आणि साऊंड सिस्टीम जप्त केली आहे. हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल गुंड या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात 11 वर्षांच्या मुलाकडून घरकाम; ‘भैया-दीदी’च्या नावाने आणले, शाळेऐवजी धुणी-भांडी अन् साफसफाई! नागरिकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलाची सुटका

Wednesday, 26 August 2026, 10:07

‘पोटचा गोळा गेल्यानं तिला धक्का बसला, ती रात्री शेतात जाऊन त्याला शोधायची’ संगीताच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा

Wednesday, 26 August 2026, 9:40

पुण्यात पहाटेपर्यंत धिंगाणा! डान्स पार्ट्या, DJचा कर्कश्य आवाज अन् दारूच्या नशेत तर्राट तरुण-तरुणी; पोलिसांनी अचानक धड टाकली अन्

Wednesday, 26 August 2026, 9:13

‘चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? गुन्हा दाखल केलाच कसा?’ रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक

Wednesday, 26 August 2026, 8:48

‘कुत्र्याला नीट पकड’ म्हणताच मालकाचं डोकं सटकलं अन् कुत्राच अंगावर सोडला; पार्श्वभागाचा अन् मांडीचा लचकाच तोडला

Wednesday, 26 August 2026, 8:19

पेपरफुटीचा आरोप, चाळणी परीक्षेत गैरप्रकार अन् शेवटी MPSC चा ‘तो’ पेपर रद्द; एमपीएससीचा मोठा निर्णय

Wednesday, 26 August 2026, 7:57
Next Post

'पोटचा गोळा गेल्यानं तिला धक्का बसला, ती रात्री शेतात जाऊन त्याला शोधायची' संगीताच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp