Wednesday, August 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पोटचा गोळा गेल्यानं तिला धक्का बसला, ती रात्री शेतात जाऊन त्याला शोधायची’ संगीताच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 August 2026, 9:40

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांनी आयुष्य संपवल्यानंतर आता दोन्ही बाजूच्या नातेवाइकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुरलीधर चांदगुडे यांच्या कुटुंबीयांकडून कुणालची आई संगीता यांच्यावर आरोप करण्यात येत असताना आता त्यांच्या बहिणी पल्लवी यांनी समोर येत चांदगुडे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. मुरलीधर आणि संगीता यांच्या लग्नापासूनच कुटुंबात संघर्ष सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

पल्लवी यांच्या म्हणण्यानुसार, संगीता आणि मुरलीधर यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना आदित्य हा पहिला मुलगा होता. लग्नानंतर सुरुवातीला मुरलीधर यांच्या कुटुंबीयांनी हे लग्न मान्य केले नव्हते. त्यानंतर दोघांना शेती मिळाली आणि त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. मुरलीधर ड्रायव्हर म्हणून काम करत असताना संगीता यांनी मुलांना पाठीला बांधून अनेक वर्षे शेती केल्याचा दावा पल्लवी यांनी केला.

मात्र, सुमारे १४ वर्षांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा आदित्य याचा मृत्यू झाला. या घटनेचा संगितावर मोठा मानसिक परिणाम झाला होता. मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून त्या सावरू शकत नव्हत्या. मुलाला शोधण्यासाठी त्या रात्री-अपरात्री शेतात जात असल्याचेही पल्लवी यांनी सांगितले.

आदित्यच्या मृत्यूनंतर संगीता आणि मुरलीधर काही दिवस माहेरी आले होते. त्याच काळात मुरलीधर यांच्या वडिलांनी मुलींना जमिनीचा काही हिस्सा दिला होता. यामुळे मुरलीधर नाराज असल्याचे पल्लवी यांनी सांगितले.

 

दरम्यान, संगीता यांना पतीचा अनेक वर्षे त्रास होता, असा आरोप केला जात असला तरी त्यांनी हा दावा फेटाळला. जर आपल्या बहिणीला मुरलीधर यांचा इतका त्रास असता, तर पती आणि मुलाच्या मागे त्यांनी स्वतःही टोकाचे पाऊल उचलले नसते, असे पल्लवी यांनी म्हटले.

तसेच मुरलीधर यांच्या नातेवाइकांकडून संगीता आणि कुणाल यांच्या मृत्यूबाबत पुरेसे दुःख व्यक्त झाले नाही, असा आरोपही त्यांनी केला. मुरलीधर यांच्या मृत्यूचेच अधिक दुःख असल्याचे दिसून आल्याने आम्हाला ही बाब अत्यंत वेदनादायी वाटली, असे पल्लवी यांनी सांगितले. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी तिन्ही मृतदेह ताब्यात घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे खवड्या डोंगरावरील घटनेनंतरचा कौटुंबिक वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात 11 वर्षांच्या मुलाकडून घरकाम; ‘भैया-दीदी’च्या नावाने आणले, शाळेऐवजी धुणी-भांडी अन् साफसफाई! नागरिकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलाची सुटका

Wednesday, 26 August 2026, 10:07

‘पोटचा गोळा गेल्यानं तिला धक्का बसला, ती रात्री शेतात जाऊन त्याला शोधायची’ संगीताच्या बहिणीचा खळबळजनक खुलासा

Wednesday, 26 August 2026, 9:40

पुण्यात पहाटेपर्यंत धिंगाणा! डान्स पार्ट्या, DJचा कर्कश्य आवाज अन् दारूच्या नशेत तर्राट तरुण-तरुणी; पोलिसांनी अचानक धड टाकली अन्

Wednesday, 26 August 2026, 9:13

‘चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? गुन्हा दाखल केलाच कसा?’ रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक

Wednesday, 26 August 2026, 8:48

‘कुत्र्याला नीट पकड’ म्हणताच मालकाचं डोकं सटकलं अन् कुत्राच अंगावर सोडला; पार्श्वभागाचा अन् मांडीचा लचकाच तोडला

Wednesday, 26 August 2026, 8:19

पेपरफुटीचा आरोप, चाळणी परीक्षेत गैरप्रकार अन् शेवटी MPSC चा ‘तो’ पेपर रद्द; एमपीएससीचा मोठा निर्णय

Wednesday, 26 August 2026, 7:57
Next Post

पुण्यात 11 वर्षांच्या मुलाकडून घरकाम; ‘भैया-दीदी’च्या नावाने आणले, शाळेऐवजी धुणी-भांडी अन् साफसफाई! नागरिकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलाची सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp