राहुलकुमार अवचट

यवत: पिंपळगाव येथे विवाहितेने दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली असून याबाबत पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पायल विशाल जाधव व पिंपळगाव येथील विशाल बबन जाधव यांचा विवाह झाला होता.

विवाहानंतर २०२३ पासून पती विशाल बबन जाधव, मावस सासू बानुबाई मनोहर जाधव, मावस सासरे मनोहर जाधव हे पायल जाधव ला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देत होते. या होणाऱ्या त्रासाला कंटाळून पायल जाधव हिने पिंपळगाव येथील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली असल्याची फिर्याद पायल जाधवची आई पूजा हनुमंत माने ( रा. जामखेड ) यांनी यवत पोलीस स्टेशन येथे दिली आहे.

यावरून पती विशाल बबन जाधव, मावस सासू बानुबाई मनोहर जाधव, मावस सासरे मनोहर जाधव ( सर्व रा. पिंपळगांव ता. दौड जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास पोसई भोसले करत आहेत.






