Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाजप आमदाराच्या ड्रायव्हरलाच दिली सुपारी! ‘आम्ही पैसे देतो, तू गोळ्या झाड’ म्हणत ऑफर दिली; राजकीय वर्तुळात खळबळ…..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 10 August 2026, 14:57

सोलापूर: सोलापूर शहरात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्यांच्या वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमदारांच्या वाहनचालकाला थेट गोळ्या झाडून आमदारांना ठार मारण्याची ऑफर देण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे राजकीय आणि पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय खरेदीसाठी सोलापूर शहरातील महावीर चौक परिसरात आले होते. त्यावेळी त्यांचा वाहनचालक आनंद सुरवसे हा गाडीजवळ थांबला होता. याचवेळी श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी हे दोघे त्याच्याजवळ आले.

दोघांनी वाहनचालकाला पैशांचे आमिष दाखवत आमदारांवर गोळीबार करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. “तुला आम्ही भरपूर पैसे देतो, तू तुझ्या आमदार दादाला गोळ्या घालून मारून टाक. यातून तुझा मोठा फायदा आहे आणि पुढचं काय ते आम्ही बघून घेऊ,” असे दोघांनी सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

ही ऑफर ऐकून आनंद सुरवसे यांनी तात्काळ नकार दिला. त्यांनी संशयितांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण उघडकीस येण्याची भीती वाटल्याने दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आनंद सुरवसे यांनी तातडीने सदर बाजार पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती देत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून श्रीशैल हुळळी आणि त्याचा साथीदार फुलारी यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

आमदारांच्या हत्येचा कथित कट आणि सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रकार असल्याने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या दोघांचा नेमका उद्देश काय होता, त्यांनी हा कट कोणाच्या सांगण्यावरून रचला होता का आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07

चार जिवलग मित्रांवर एकत्रित अंत्यसंस्कार; ”‘देवा आमच्यावर हा अन्याय का केलास” म्हणत माऊलींचा आक्रोश; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

Saturday, 3 October 2026, 16:00

न सांगता घर सोडलं, ४ दिवसांपासून बेपत्ता, एक चिठ्ठी अन् लॉजवर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Saturday, 3 October 2026, 15:52

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:36

“मी पण गे आहे, आपण भेटायचं का?” म्हणत तरुणाला बोलावलं अन् पुण्यात पडक्या खोलीत नेल्यानंतर २२ वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 3 October 2026, 15:28

“पुण्यात 22 तासांत 123 मुली बेपत्ता?” व्हायरल ऑडिओ-रीलने खळबळ; पोलिसांनी सांगितलं सत्य

Saturday, 3 October 2026, 15:27
Next Post

तो एक साधा डिलिव्हरी बॉय पण पुण्यात घेतलं आलिशान घर; पैसे कमवण्यासाठी करायचा 'तसला' प्रकार; कारनामा ऐकून पोलिसही हैराण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp