Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 October 2026, 16:07

लोणी काळभोर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा अवैध साठा करून विक्री करणाऱ्या टोळीवर मांजरी (ता. हवेली) परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, गुटख्याचा पुरवठा करणारा संशयित फरार झाला आहे. पोलिसांनी गुटखा, पानमसाला, तंबाखूजन्य पदार्थ, इलेक्ट्रिक दुचाकी आणि मोबाईल असा एकूण 3 लाख 11 हजार 41 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

राजरत्न धुराप्पा गवळी (वय 21, रा. मांजरी बु.) आणि भगवान शिवराम गवळी (वय 27, रा. मांजरी बु.) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर जगदिश सोलंकी (रा. वाघोली) हा संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार 30 सप्टेंबर रोजी मांजरी बुद्रुक येथील सम्राट पान शॉपच्या पाठीमागे, माळवाडी परिसरात अन्न सुरक्षा अधिकारी दिपाली घोडके यांच्या उपस्थितीत पंचांसमक्ष कारवाई करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी पथक-2, गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व त्यांच्या पथकाने राजरत्न गवळी याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पोत्यांची झडती घेतली असता विविध कंपन्यांचा पानमसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आला. या मुद्देमालाची किंमत 97 हजार 350 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून सुमारे 70 हजार रुपयांची इलेक्ट्रिक मोटारसायकल आणि 25 हजार रुपयांचा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला.

चौकशीत राजरत्न गवळी याने हा प्रतिबंधित माल वाघोली येथील जगदिश सोलंकी याच्याकडून विक्रीसाठी खरेदी केल्याची माहिती दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सोलंकी याचे वाघोली येथे गोडाऊन असून, तेथून किरकोळ विक्रेत्यांना प्रतिबंधित माल पुरविला जात असल्याचेही त्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर पोलिसांचे पथक राजरत्न गवळी याला सोबत घेऊन वाघोलीतील काळे कॉम्प्लेक्स, वाघमारे वस्ती परिसरात पोहोचले. तेथील एका गाळ्यात प्रतिबंधित पानमसाला, तंबाखू आणि गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांचे पथक गाळ्याकडे जात असताना एक संशयित व्यक्ती जिन्यावरून घाईघाईने खाली येताना दिसली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. राजरत्न गवळी याने तो व्यक्ती जगदिश सोलंकी असल्याचे सांगितल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.

 

पोलिसांनी गाळ्याची झडती घेतली असता तेथून विविध प्रकारचा पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ असा 73 हजार 691 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गाळा जगदिश सोलंकी याने माल साठवण्यासाठी भाड्याने घेतल्याची माहिती गाळामालकाने पोलिसांना दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, राजरत्न गवळीचा साथीदार भगवान शिवराम गवळी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. अशाप्रकारे मांजरी आणि वाघोली परिसरातील कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांसह इलेक्ट्रिक दुचाकी व मोबाईल असा एकूण 3 लाख 11 हजार 41 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी दिपाली भाऊसाहेब घोडके यांनी मांजरी पोलीस ठाण्यात राजरत्न धुराप्पा गवळी, भगवान शिवराम गवळी आणि आरोपी जगदिश सोलंकी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत तक्रार दाखल केली आहे. मांजरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पुढील तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन पोलिसांचे कंजारभट वस्त्यांमध्ये रोजगारासाठी ‘मिशन परिवर्तन’ ; पांढरस्थळ, काळेशिवार आणि भवरापूरमधील वस्त्यांना दिली भेट

Saturday, 3 October 2026, 16:55

निवडणूक कर्तव्याला दांडी; सहाय्यक अभियंता शुभांगी पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Saturday, 3 October 2026, 16:50

पुर्णेकर हत्याकांडात ‘लावण्या’ची एन्ट्री! हत्येपूर्वीची तिची हालचाल संशयाच्या भोवऱ्यात,पोलिसांच्या तपासाला नवी दिशा

Saturday, 3 October 2026, 16:44

कॉलेजला गेली अन् घरी परतलीच नाही; लोणी काळभोर येथील पोलीस कर्मचाऱ्याची 22 वर्षीय तरुणी बेपत्ता

Saturday, 3 October 2026, 16:31

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07

चार जिवलग मित्रांवर एकत्रित अंत्यसंस्कार; ”‘देवा आमच्यावर हा अन्याय का केलास” म्हणत माऊलींचा आक्रोश; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

Saturday, 3 October 2026, 16:00
Next Post

कॉलेजला गेली अन् घरी परतलीच नाही; लोणी काळभोर येथील पोलीस कर्मचाऱ्याची 22 वर्षीय तरुणी बेपत्ता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp