Friday, October 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी नवरात्रीची खास भेट! एका दिवसात अनेक देवींचं दर्शन, जाणून घ्या बसचे मार्ग आणि तिकीट

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 9 October 2026, 9:32

पुणे : नवरात्रीच्या काळात देवींच्या मंदिरांना भेट देण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे पुणे शहर आणि परिसरातील विविध देवींच्या मंदिरांचे दर्शन एकाच प्रवासात घेता येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रवासासाठी वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक बसची व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक प्रवाशासाठी तिकीट दर 500 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

‘पुणे दर्शन’ बससेवेच्या धर्तीवर ही पर्यटन सेवा राबवली जाणार आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी या बस उपलब्ध असतील. तसेच इतर दिवशीही पर्यटकांकडून मागणी आल्यास बससेवा दिली जाणार असल्याची माहिती पीएमपीएमएलने दिली आहे.

देवीदर्शनासाठी दोन स्वतंत्र पर्यटन फेऱ्या

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना देवींच्या विविध मंदिरांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी पीएमपीएमएलने दोन वेगवेगळ्या पर्यटन फेऱ्यांचे नियोजन केले आहे. पहिल्या फेरीत पुणे स्टेशनपासून प्रवासाला सुरुवात होईल. त्यानंतर स्वारगेटमार्गे तळजाई माता मंदिर आणि पर्वती मंदिर येथे जाता येईल. पुढे कात्रजमधील तुकाई माता मंदिरासह श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरी माता मंदिर आणि यमाई माता मंदिराला भेट देण्याची सुविधा असेल. या मार्गावरील बस सकाळी 8.30 वाजता निघून सायंकाळी 7 वाजेपर्यंत पुणे स्टेशनला परतणार आहे.

 

दुसऱ्या फेरीत शहरातील अन्य प्रसिद्ध देवीस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रवासात महालक्ष्मी मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिरासोबत चतुःशृंगी माता मंदिरात दर्शन घेता येईल. तसेच वैष्णवी माता मंदिर आणि भवानी माता मंदिरालाही भेट देता येणार आहे. या मार्गासाठीही पुणे स्टेशन हे सुरुवातीचे आणि परतीचे ठिकाण असेल. बस सकाळी 8.30 वाजता रवाना होऊन सायंकाळी 7 वाजता परत येईल.

तिकीट बुकिंग कुठे कराल?

दोन्ही बससेवांसाठी प्रतिप्रवासी 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. इच्छुक भाविकांना डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे महापालिका भवन, भोसरी बसस्थानक आणि निगडी येथील पास केंद्रांवर आरक्षण करता येईल.

अधिक माहितीसाठी पीएमपीचे समन्वयक सेवक नितीन गुरव यांच्याशी 9850501862 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. नवरात्रीत भाविकांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला, पण आता मोठा अडथळा! 4,462 घरांच्या लॉटरीत अर्जदारांची धावपळ

Friday, 9 October 2026, 10:23

पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची 17 स्थानके सुरू होण्याचा मार्ग मोकळा; उद्घाटन होणार ‘या’ तारखेला

Friday, 9 October 2026, 10:08

पुणेकरांसाठी नवरात्रीची खास भेट! एका दिवसात अनेक देवींचं दर्शन, जाणून घ्या बसचे मार्ग आणि तिकीट

Friday, 9 October 2026, 9:32

नामांकित खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या तरुणीसोबत अश्लील चाळे; गुन्हा दाखल होताच कर्मचारी पसार

Friday, 9 October 2026, 9:22

मानदुखीवर हॉट वॉटर बॅगचा शेक घेणं जीवावर बेतलं? पुण्यात IT अभियंत्याचा मृत्यू; 30 वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 9 October 2026, 9:13

थेऊर येथे 150 टनाच्या कचरा प्रकल्पाला PMRDA ची मंजुरी; लोणी काळभोर, उरुळी कांचनसह 14 ग्रामपंचायतींचा कचराप्रश्न सुटणार…

Friday, 9 October 2026, 8:58
Next Post

पुणेकरांसाठी मोठी बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची 17 स्थानके सुरू होण्याचा मार्ग मोकळा; उद्घाटन होणार 'या' तारखेला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp