Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेपरफुटीचा आरोप, चाळणी परीक्षेत गैरप्रकार अन् शेवटी MPSC चा ‘तो’ पेपर रद्द; एमपीएससीचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 26 August 2026, 7:57

पुणे: पेपरफुटीच्या आरोपांनी चर्चेत आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) मोठा निर्णय घेतला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब संवर्गाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आणि त्यानंतरच्या पोलीस तपासाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हा निर्णय घेतला.

या परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न परीक्षेपूर्वीच काही उमेदवारांपर्यंत पोहोचल्याच्या तक्रारी आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास सोपवला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात एका विशिष्ट उमेदवाराला परीक्षेपूर्वीच प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा त्याला प्रत्यक्ष फायदा झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आल्याची माहिती आहे.

परीक्षेतील गैरप्रकारामुळे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांवर अन्याय होऊ नये आणि भरती प्रक्रियेची पारदर्शकता कायम राहावी, यासाठी संपूर्ण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या भरतीसाठी यापूर्वी झालेली परीक्षा आता ग्राह्य धरली जाणार नाही.

आता या पदांसाठी एमपीएससीकडून पुन्हा फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी ज्या उमेदवारांनी यशस्वीपणे अर्ज केला आहे, त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. तसेच फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवीन तारीख आणि इतर तपशील आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.

 

दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय आणि विद्यार्थी संघटनांकडूनही आवाज उठवण्यात आला होता. आमदार रोहित पवार यांनी पेपरफुटीचा आरोप केला होता. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊनही आपली भूमिका मांडली होती. पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोरही एका विद्यार्थिनीने या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर अखेर एमपीएससीने परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तो’ अपघात नव्हता, घातपातच! १० ऑक्टोबरला मोठा स्फोट करणार; रोहित पवारांच्या खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात भूकंप

Monday, 28 September 2026, 15:14

सुशांत सिंह राजपूतचा पाय मोडला होता, डोळ्यांजवळ जखमा होत्या; 6 वर्षांनी मृत्यूबाबत नवा दावा

Monday, 28 September 2026, 15:12

जामखेडच्या कलाकेंद्रात रक्तरंजित थरार! गर्भवती नर्तिकेचं अपहरण करत मारहाण; बेशुद्धावस्थेत पेट्रोल टाकून जाळलं, नेमकं काय घडलं?

Monday, 28 September 2026, 15:00

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘दिखाऊ’ पंचनामा; दहा हजार ब्रास मुरूम उत्खननाचा पर्यावरणप्रेमींचा दावा; पंचनाम्यात नोंद मात्र 246 ब्रास!

Monday, 28 September 2026, 14:56

पुण्यात गणपती विसर्जनाची गडबड अन् शनिवार पेठेत खळबळ! घराला कुलूप पाहून डाव टाकला अन् ३० लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला

Monday, 28 September 2026, 14:31

आज सोने खरेदी करणं योग्य की थांबावं? दर आणि बाजारातील संकेत जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 14:30
Next Post

'कुत्र्याला नीट पकड' म्हणताच मालकाचं डोकं सटकलं अन् कुत्राच अंगावर सोडला; पार्श्वभागाचा अन् मांडीचा लचकाच तोडला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp