उरुळी कांचन, (पुणे) : शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे केंद्र, राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड…होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजार मैदान परिसरात रविवारी (ता. ०८) घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेनेच केंद्र, राज्य शासनाच्या अनेक योजनांना गाजर योजना, फेकू योजना, कागद योजना, जाहिरातबाज योजना असे नामकरण केल्याची टीका शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे करण्यात आली. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार उरुळी कांचन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख माऊली कटके, हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, जिल्हा संघटक रमेश भोसले, जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब कांचन, उरुळी कांचन शहर प्रमुख सचिन कांचन, युवा सेना तालुकाप्रमुख प्रताप कांचन, संजय कुंजीर, रमेश कांचन, लाला तुपे, रमेश तुपे, श्रीकांत मेमाणे, कृष्णा चौधरी, राहुल काकडे, माऊली माथेफोड, युवराज महाडीक, खलील शेख, शिवाजी ननवरे, राजेंद्र बोरकर, आप्पासाहेब कड, बापूसाहेब टिळेकर, सागर कांचन, अवदूत राऊत, तसेच यावेळी अनेक जेष्ठ व युवा शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान, प्रास्ताविकातून उज्ज्वला गॅस, कामगार पेन्शन, श्रावणबाळ, बेरोजगार युवकांना रोजगार भत्ता आदी योजनांपासून लाभार्थी वंचित असून या योजना फक्त कागदावरच आहेत. उरुळी कांचन येथून काढण्यात आलेल्या चित्रफिती द्वारे सरकारने दिलेले आश्वासनांचा आढावा तसेच किती योजना पूर्ण झाल्या व किती योजना पूर्ण झाल्या नाहीत अशा प्रश्नावलीची नागरिकांना माहिती विचारत रथ उरुळी कांचन गावातून फिरविण्यात आला.