Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर, उरुळी कांचन-कोरेगाव मूळ गटात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देवदर्शन-सहलींचा सपाटा; लोकानुनयामुळे लोकशाही धोक्यात?  

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 15 January 2026, 17:30

उरुळी कांचन (पुणे): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यांवर लढल्या जाव्यात, असे अपेक्षित असतानाही थेऊर, उरुळी कांचन व कोरेगाव मूळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक याला अपवाद ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तसेच इतर पक्षांकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून नागरिकांच्या मूलभूत अडचणींवर चर्चा करण्याऐवजी देवदर्शन, सहली आणि विविध आकर्षणांवर भर दिला जात असून मतदारांचे लोकानुनय घडवून आणले जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. (Theur, Uruli Kanchan-Koregaon zp)

 

निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या रचनात्मक विषयांवर ठोस कार्यक्रम राबवण्याबाबतची भूमिका कोणत्याही पक्षाकडून अद्याप समोर आलेली नाही. उलटपक्षी, प्रतिस्पर्धी उमेदवारी कशी अडवायची, कोणाला कसे रोखायचे, राजकीय डावपेच कसे रचायचे यावरच चर्चा केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक काळात तसेच निवडणूक निकालानंतरही जनतेच्या विकासाचे मुद्दे बाजूला पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हा परिषदेला ग्रामीण विकासाचे प्रमुख केंद्र म्हटले जाते.  जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’चे स्वरूप प्राप्त झाले असून, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, बांधकाम तसेच महिला व समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागातील मूलभूत सेवा व सुविधांसह सर्वांगीण विकासाची जबाबदारी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर असते. मात्र यंदा पार पडत असलेल्या निवडणुकांमध्ये निवडणुकीच्या प्रचारात इच्छुक उमेदवार ही निवडणूक विकासात्मक मुद्द्यांऐवजी भावनिक, धार्मिक आणि आर्थिक प्रलोभनांवरच लढवताना दिसून येत आहेत.

दरम्यान, या गटात निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून जनतेसमोर कुठलाही कृती कार्यक्रम, जाहीरनामा किंवा वचननामा   सादर करण्यात आलेला नाही. निवडून आल्यानंतर उमेदवार कोणती कामे करतील यावर चर्चा होणे आवश्यक आहे. मात्र  त्यावर कोणतीही ठोस चर्चा होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनता देवदर्शन सारख्या यात्रांवर मतदान करेल असे मतदारांना ग्राह्य धरले जात आहे. भावनिक, धार्मिक आणि आर्थिक प्रलोभनांमुळे विकासाचा मुद्दा झाकोळला गेला आहे. परिणामी मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून देवदर्शन व सहलींचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे चित्र आहे.

लोकशाहीसाठी धोक्याची घंटा

निवडणूक काळात आरोग्य, पाणीपुरवठा, रोजगार, शेतकरी प्रश्न यांसारख्या ज्वलंत समस्यांवर उमेदवार बोलताना दिसत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. निवडणुका जवळ आल्यावर केवळ देवदर्शन, भेटवस्तू किंवा इतर  प्रलोभने दाखवून मतदारांना गुंतवले जात असल्याचा आरोप काही जागरूक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अशा दिखाऊ उपक्रमांपेक्षा स्थानिक प्रश्नांवर उमेदवारांची भूमिका काय आहे, विकासाचा त्यांचा अजेंडा नेमका काय आहे? हे तपासणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. पैसा, भेटवस्तू आणि देवदर्शनाच्या जोरावर मते मिळवण्याची प्रवृत्ती लोकशाहीसाठी धोकादायक ठरेल, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.

लोकानुनयापासून साम, दाम, दंड भेदाचा वापर

पैसे देणे, दारू व मेजवानी, दारूच्या बाटल्या वाटप, कोंबडी पार्टी, जेवणावळी, साड्या, ब्लँकेट,  इथपासून ते मतदारांना दबाव व भीती दाखवणे इथपर्यंत साम दाम दंड भेद यांचा वापर होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.

ही सर्व प्रलोभने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून कायद्याने गुन्हा आहे. मतदारांनी अशा प्रकारांना बळी न पडता निर्भयपणे आणि स्वेच्छेने मतदान करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

 “निवडणूक ही धार्मिक, भावनिक किंवा आर्थिक प्रलोभनांची स्पर्धा नसून विकासाच्या विचारांची लढाई असली पाहिजे. आदर्श आचारसंहिता भंग करणाऱ्या उमेदवारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मतदारांनी निर्भयपणे, कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करणे हीच खरी लोकशाही आहे.”

 – अॅड. गणेश दत्तात्रय जाधव, पुणे

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:54
daund crime

Daund Fraud News : दौंडमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकऱ्याला 7 लाखांचा गंडा ; मुकादमावर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:51

Pune News : उरुळी देवाची येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून 6 लाखांहून अधिक ऐवज लंपास..

Monday, 27 April 2026, 13:41
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Fursungi News : “आयटी इंजिनिअर महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ ; 5 जणांवर गुन्हा दाखल..

Monday, 27 April 2026, 13:37

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीसह त्याच्या 9 साथीदारांवर नगर जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 12:55
135 crore drugs seized in pune four arrested

Pune News : पुणे पोलिसांचा ‘ड्रग्स’ माफियावर सर्जिकल स्ट्राईक ; वाघोली, लोणीकंदसह परिसरात छापे, 11 आरोपी गजाआड, राजस्थान कनेक्शन उघड

Monday, 27 April 2026, 12:19
Next Post
devendra fadnavis

Devendra Fadanavis: फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट संकटात! 2 वर्षांत 20% च काम पूर्ण; शेतकऱ्यांना वीज मिळणार की नाही?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.