Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ‘त्या’ थरारक खुनाचा अवघ्या 48 तासांत छडा; अल्पवयीन आरोपी ताब्यात, शिक्रापूर पोलीस अन् ‘एलसीबी’ची कामगिरी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 10 June 2026, 18:40

शिक्रापूर, (पुणे) : शिरूर तालुक्यातील मौजे वरूडे (रानमळा) येथे दोन दिवसांपूर्वी ओट्यावर झोपलेल्या एका 43 वर्षीय व्यक्तीचा गळा चिरून करण्यात आलेल्या निर्घृण खुनाचा उलगडा करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. जुन्या भांडणाच्या आणि शिवीगाळीच्या रागातून गावातीलच एका अल्पवयीन मुलाने हा आखून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) समांतर तपास करीत अवघ्या 48 तासांत गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणातील आरोपी अल्पवयीन बालकास पोलिसांनी अटक केली आहे.

 

शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासो बबन तांबे (वय-43, रा. रानमळा, वरूडे, ता. शिरूर) हे सोमवारी (ता. 08) रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घरात उकाडा होत असल्यामुळे घराबाहेर असलेल्या ओट्यावर झोपण्यासाठी गेले होते. ते गाढ झोपेत असताना, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात मारेकऱ्याने त्यांच्या गळ्यावर धारदार हत्याराने प्रहार करून त्यांचा निर्घृण खून केला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

या घटनेने शिरूर तालुक्यात मोठी दहशत निर्माण झाली होती. मयताचे भाऊ प्रकाश बबन तांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) समांतर तपासाचे आदेश दिले.

पोलिसांनी मयताच्या भूतकाळातील वादांचा आणि शत्रुत्वाची सखोल माहिती घेण्यास सुरुवात केली. संशयाची सुई वरूडे गावातीलच एका अल्पवयीन बालकाकडे वळली. पोलिसांनी तात्काळ त्या अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांसमक्ष ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची दिलेली कबुली ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

मयत बाळासो तांबे आणि या अल्पवयीन मुलामध्ये दोन वर्षांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले होते. हा जुना राग मनात असतानाच, 8 दिवसांपूर्वी मयत बाळासो तांबे यांनी या मुलाला पुन्हा रस्त्यात गाठून शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याची धमकी दिली होती. याच अपमानाचा आणि रागाचा बदला घेण्यासाठी या अल्पवयीन मुलाने 8 जूनच्या रात्री बाळासो ओट्यावर झोपल्याची संधी साधून त्याने धारदार लोखंडी कोयत्याने थेट त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांचा गेम वाजवला.

शिक्रापूर पोलिसांनी सदर अल्पवयीन बालकाला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून खून करण्यासाठी वापरलेला १ लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील पोलीस हवालदार सोमनाथ कचरे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजित जगताप करत आहेत. अवघ्या ४८ तासांत खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांचेसह श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, स्थानिक गुन्हे शाखेचे जनार्धन शेळके, राजु मोमीन, तुषार पंदारे, संजु जाधव, सागर धुमाळ, शिकापुर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, अमोल नलगे, प्रतिक जगताप, नारायण वाळके, राम जाधव, मच्छिंद्र निचीत यांचे पथकाने केली आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात साडेचौदा वर्षांच्या मुलीचा विवाह लावून दिला! पती आणि नातेवाईकांविरोधात खराडी पोलिसांची मोठी कारवाई

Wednesday, 10 June 2026, 20:18

“मी साधा माणूस, तुम्ही मोठी माणसं”; दत्तात्रय भरणे यांची शेतकऱ्यांशी ‘मस्करी’? ‘त्या’ एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

Wednesday, 10 June 2026, 19:38

बारामतीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 55 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त, आरोपी अटकेत..

Wednesday, 10 June 2026, 19:10

शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ‘त्या’ थरारक खुनाचा अवघ्या 48 तासांत छडा; अल्पवयीन आरोपी ताब्यात, शिक्रापूर पोलीस अन् ‘एलसीबी’ची कामगिरी..

Wednesday, 10 June 2026, 18:40

विवाहितेची माहेरी आल्यावर जुन्या मित्रांसोबत दारुपार्टी! ‘त्या’ एका मागणीला नकार दिला म्हणून मित्रांनीच केला खून; अर्धनग्न मृतदेह जंगलात फेकला अन्…

Wednesday, 10 June 2026, 18:34

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी; 754 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना जाहीर, 12 जूनला आरक्षण सोडत तर ओबीसी’ आरक्षणावर निवडणूक आयोगाची करडी नजर..

Wednesday, 10 June 2026, 18:10
Next Post

बारामतीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 55 हजारांचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त, आरोपी अटकेत..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.