उरुळी कांचन, (पुणे) : योगासने करण्याच्या बहाण्याने घराशेजारी राहणाऱ्या एका कथित शिक्षकाने १८ वर्षीय मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. उरुळी कांचन (Uruli Kanchan) परिसरात ही घटना मंगळवारी (ता. ०७) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
भज्जूलाल रायकवार काका (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी १८ वर्षीय पिडीत मुलीने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली असून ती सुट्टीकरीता तिच्या आई व वडिलांकडे राहायला आली होती. मंगळवारी दुपारी मुलीचे आई वडील कामाला गेले होते. तर भाऊ माझ्या शेजारी फोनवर बोलत होता. यावेळी शेजारी राहणारे भज्जूलाल रायकवार काका हे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुलीच्या घरी आले होते.
यावेळी रायकवार याने विचाराले की तुला योगासने येतात का? यावेळी मुलीने मोजकेच येत असल्याची माहिती रायकवार यांना दिली. यावेळी ते घरात आले व त्यांनी पद्मासन, सुखासन, सिध्दासन हे योगासनाचे प्रकार शिकवले. दोन योगासनाची माहिती असलेले कागद दिले व तो राहत असलेल्या घरी येण्यासाठी सांगितले. घरी गेल्यानंतर दोन योगासनाचे प्रकार शिकविले व आरोपीने मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, यावेळी पिडीत मुलगी घाबरली होती. आरोपीने मुलीला जवळ घेऊन कोणाला काही सांगू नको असे म्हणाला. यावेळी घाबरलेल्या अवस्थेत पिडीत मुलीने बहीण व मावस बहीण यांना जोरात आवाज दिला. व घडलेली घटना सांगितली. बहीणीनी त्या काकाला मारहाण केली. यावेळी घडलेली घटना आई वडील व नातेवाईक यांना फोन करुन सांगितली आणि उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कथित योगा शिक्षक भज्जूलाल काका याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड करीत आहे.