Monday, September 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर फाटा येथील ‘श्रीनाथ पतसंस्थेला’ 1.59 कोटींचा निव्वळ नफा; सभासदांना 14 टक्के लाभांश जाहीर – चेअरमन संदीप धुमाळ यांची माहिती..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 21 September 2026, 15:32

लोणी काळभोर, (पुणे) : पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभाराच्या जोरावर आपल्या कामकाजाचा ठसा उमटवणाऱ्या कुंजीरवाडी हद्दीतील थेऊरफाटा येथील ‘श्रीनाथ पतसंस्थेला’ आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 1.59 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. या घवघवीत यशाच्या जोरावर संस्थेच्या सर्व सभासदांना 14 टक्के इतका लाभांश जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप धुमाळ यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या श्रीनाथ पतसंस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊरफाटा येथील ‘हॉटेल एस 4 जी’ येथे रविवारी (ता. 20) उत्साहात आणि सभासदांच्या उदंड उपस्थितीत पार पडली.

यापुढे बोलताना संदीप धुमाळ म्हणाले की, 31 मार्च 2026 अखेर पतसंस्थेकडे 45 कोटी 90 लाख रुपयांच्या ठेवी जमा असून, संस्थेने 35 कोटी 92 लाख रुपयांचे सुरक्षित कर्जवाटप केले आहे. तसेच विविध सुरक्षित मार्गांनी 26 कोटी 49 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सध्या संस्थेचे एकूण खेळते भांडवल 65 कोटी 38 लाख रुपयांवर पोहोचले असून, कर्जाची वसुली 92.21 टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे, आजच्या आव्हानात्मक सहकार क्षेत्रात श्रीनाथ पतसंस्थेने एनपीए (NPA)शून्य टक्के राखत आर्थिक शिस्तीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

या वार्षिक सभेचे औचित्य साधून पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘श्रीनाथ गुण गौरव पुरस्कार 2026’ देऊन गौरव करण्यात आला. तसेच, संस्थेच्या प्रगतीत योगदान देणारे ज्येष्ठ सभासद आणि विशेष कार्याबद्दल ज्ञानेश्वर धुमाळ व गणेश आंबेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष संदीप धुमाळ, उपाध्यक्ष संभाजी आंबेकर, कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ, ज्येष्ठ संचालक महादेव धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे, परिस फाउंडेशनच्या अध्यक्षा व माजी सरपंच सुनीता धुमाळ, वैशाली मेमाने, राहुल धुमाळ, दीपक खटाटे, सुभाष गाडवे, अजय कुंजीर, राजेंद्र गायकवाड, उमेश राखपसरे, विश्वनाथ रूपनर, पोपट चौधरी, दत्तात्रय कुंजीर आणि व्यवस्थापक शिवाजी जावळे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे अहवाल वाचन व सूत्रसंचालन संस्थेचे कार्यकारी संचालक ज्ञानेश्वर धुमाळ यांनी केले.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘मी CBIचा अधिकारी आहे’ सांगत ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची धमकी देत १०० कोटींचा गंडा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Monday, 21 September 2026, 19:14

सूर्यनमस्कारातून आरोग्याचा संदेश; यथार्थ योग स्टुडिओच्या स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Monday, 21 September 2026, 18:46

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पूर्व हवेली तालुका अध्यक्षपदी वंदना काळभोर

Monday, 21 September 2026, 18:36

“उरुळी कांचन येथे जेवणासाठी गाडी पार्क करताना काळाचा घाला” ऊसाच्या ट्रॉलीखाली पाय सापडून एकजण गंभीर जखमी

Monday, 21 September 2026, 18:24

गणेश उत्सवानिमित्त एसजीए ग्रुपचा स्त्युत्य उपक्रम, रक्तदान शिबिरात 111 बाटल्यांचे संकलन

Monday, 21 September 2026, 18:20

पुणेकरांच्या खिशाला बसणार मोठा फटका! पार्किंग शुल्कात तब्बल दुप्पट-तिप्पट वाढ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव

Monday, 21 September 2026, 18:14
Next Post

दिवसा कुऱ्हाड घेऊन गावात फिरला अन् रात्री खून! बाप-लेकाचं भयानक कृत्यं; अनैतिक संबंधांच्या संशयाचा रक्तरंजित शेवट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp