(Shirur News) शिरूर : तालुक्यातील संविंदणे येथील उसाच्या शेतात बिबट्याची चार बछडे आढळून आली होती. त्यांनी त्यांच्या मातेकडे पुन्हा सुखरुपपणे पोहोचविण्याची कामगिरी
वन विभागाने केली आहे.
संविंदणे येथील लंघे मळ्यात उसाच्या एका शेतात बिबट्याचे चार बछडे आढळून आले होते. एक ते दीड महिन्याचे हे बछडे असावेत. ज्या उसाच्या शेतामध्ये हे बछडे सापडले होते त्याच परिसरात एका बास्केटमध्ये हे चारही बछडे ठेवण्यात आले होते. सोमवारी (२० मार्च) रात्री या बछड्याची आई उसाच्या शेतात आली आणि आपले सर्व बछडे पुन्हा घेऊन गेली. अशी माहिती वनपरिक्षेत्र आधिकारी मनोहर म्हसेकर यांनी माध्यमांना दिली.
हे बछडे पुन्हा मातेकडे पोहोचविण्याचा कामी वनपाल गणेश पवार, ऋषीकेष लाड, हनुमंत कारकुड, शौकत शेख यांनी सहभाग घेतला. दरम्यान हे बिछडे पुन्हा या परिसरात कोण्याचा शेतात आढळून आल्यास वनविभागास कळवावे, असे आवाहन म्हसेकर यांनी केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Shirur News : आमदाबाद विद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न!