Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शिरूरमध्ये मांडवगण फराटा–वडगाव रासाई गटात चौरंगी लढत; स्वाभिमानी विकास आघाडीमुळे चुरस वाढली……

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 24 January 2026, 20:17
Shirur News: Four-way fight in Mandavgan Farata-Vadgaon Rasai group in Shirur; The competition has increased due to Swabhimani Vikas Aghadi......

मांडवगण फराटा: शिरूर तालुक्याच्या पूर्व (Shirur News) भागातील मांडवगण फराटा–वडगाव रासाई जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय वातावरण चांगलेच (ZP Election) तापले असून, यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि बहुरंगी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार व शरदचंद्र पवार) दोन्ही गट एकत्र आल्यानंतर उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज नेत्यांनी एकत्र येत ‘स्वाभिमानी विकास आघाडी’ स्थापन केल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली आहेत. (Latest Marathi News)

 

मागील अनेक निवडणुकांमध्ये मांडवगण फराटा हा जिल्हा परिषद गट एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता.मात्र पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन गट अस्तित्वात आल्यानंतर अनेक कार्यकर्ते व नेते अजित पवार गटात सहभागी झाले, तर माजी आमदार ॲड. अशोक पवार हे शरदचंद्र पवार गटात ठामपणे कायम राहिले. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता, अशोक पवार यांच्या भूमिकेला मान देत त्यांच्याशी संबंधित उमेदवार विजयी झाले आहेत.

महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्यानंतर या भागात अशोक पवार यांच्या सौभाग्यवती सुजाता पवार यांना घड्याळ चिन्हावरून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या गटातील अनेक इच्छुकांना डावलण्यात आल्याने त्या नेत्यांची तीव्र नाराजी उफाळून आली.

त्यामध्ये प्रामुख्याने घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, सुधीर फराटे, राजीव फराटे पाटील, राजेंद्र गदादे,दादासाहेब कोळपे, तसेच पंचायत समितीसाठी विजेंद्र गद्रे, दीपाली नागवडे व अनुराधा घाडगे हे इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्याने या सर्वांनी एकत्र येत स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन केली. या आघाडीमार्फत मांडवगण फराटा-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटासाठी दादा पाटील फराटे, पंचायत समिती वडगाव रासाई गणासाठी विजेंद्र गद्रे, तर मांडवगण फराटा गणासाठी दीपाली नागवडे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

दरम्यान, भाजपकडून जिल्हा परिषद गटासाठी सचिन शेलार यांना प्रबळ दावेदार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मच्छिंद्र गदादे हे मैदानात उतरले आहेत. याशिवाय पंचायत समितीसाठी स्वाती शिवाजी मचाले व पोपट शेलार, अनिल कांबळे, माऊली पाटोळे, विकास शेलार, पल्लवी घाडगे, अनुराधा घाडगे, लतिका वराळे, स्वाती फराटे, पूजा मचाले, अंकुश सोनवणे या प्रमुख इच्छुक उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत.

जिल्हा परिषदेच्या पहिल्याच कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती राहिलेल्या सुजाता पवार आणि गेली सुमारे 30 वर्षे राजकारणात सक्रिय असलेले दादा पाटील फराटे यांच्यातील ही लढत प्रतिष्ठेची व अस्तित्वाची मानली जात आहे. तसेच ग्रामपंचायत पातळीवर अशोक पवार यांच्या पॅनलचा पराभव करणारे भाजपचे सचिन शेलार हे माजी आमदार ॲड. अशोक पवार यांना कसा ‘चेकमेट’ देतात,याकडे संपूर्ण शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

थेट चौरंगी लढतीमुळे मांडवगण फराटा-वडगाव रासाई गटात यंदा प्रथमच वेगळे आणि रोचक राजकीय चित्र उभे राहिले आहे. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04

Delhi Judge Suicide : ‘पप्पा, जगणं अवघड झालंय…’ फोननंतर काही तासांतच न्यायाधीशाची आत्महत्या; वैवाहिक वादाचा संशय”

Sunday, 3 May 2026, 12:16

Pune News : हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी गैरवर्तन, आरोपी अटकेत

Sunday, 3 May 2026, 12:09
Next Post
Ajit Pawar: "Have you done your own work?" Ajit's anger at the workers who sabotaged the campaign; He gave 'this' message to both of them in the public meeting

Ajit Pawar: "स्वतःचं काम झालं की झालं का?" प्रचाराला दांडी मारणाऱ्या कार्यकर्त्यांवर अजितदादांच्या संताप; भरसभेत दोघांना दिला 'हा' निरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.