Pune Crime News : पुणे : पुण्यातील धायरी परिसरात कौटुंबिक वादातून सुनेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रायकर मळा भागात घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपी सासरा सध्या फरार आहे. स्वाती तेजस चौधरी (वय -31) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या गृहिणी होत्या. त्यांचे पती शिवाजीनगर न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. Pune Crime News

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी पती कामावर गेल्यानंतर घरात स्वाती, त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा आणि सासरे होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वाती आणि सासऱ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर स्वाती कपडे धुण्यासाठी गेल्या असताना सासऱ्याने संतापाच्या भरात त्यांचे डोके प्रसाधनगृहाच्या भिंतीवर आपटले. त्यानंतर कपडे धुण्याच्या दगडाने त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आला. Pune Crime News
या हल्ल्यात स्वाती गंभीर जखमी होऊन प्रसाधनगृहात रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. घटनेनंतर आरोपीने जखमी सूनेला रुग्णालयात न नेता घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला. Pune Crime News
दरम्यान, दुपारी घरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या बाळाच्या रडण्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुलूप तोडले असता स्वाती गंभीर अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. Pune Crime News
दम्यान या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपी सासऱ्याचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. Pune Crime News







