Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘हॅलो मी सिया बोलतेय’ पोलीस पाटलाला गोडगोड बोलून फसवलं अन् शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली घातला ५६ लाखांचा गंडा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 29 July 2026, 9:29

पुणे: पुणे जिल्ह्यात ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ५६.२५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील एका आकर्षक जाहिरातीला भुललेल्या मुळशी तालुक्यातील एका पोलीस पाटलाला चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी मोठा गंडा घातला. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी “सिया” नाव सांगणाऱ्या महिलेसह इतर अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत ही फसवणूक झाली. तक्रारदाराला सोशल मीडियावर एका नामांकित ब्रोकरेज कंपनीसारखी दिसणारी जाहिरात दिसली. जाहिरातीवर क्लिक करताच त्यांना व्हॉट्सअॅपवरील गुंतवणुकीशी संबंधित एका ग्रुपमध्ये जोडण्यात आले.

यानंतर “सिया” नाव सांगणाऱ्या एका महिलेने त्यांच्याशी संपर्क साधला. तिने ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांच्या मोबाईलमध्ये एक ट्रेडिंग अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले. विश्वास बसावा म्हणून सुरुवातीला अॅपमध्ये बनावट नफा दाखवण्यात आला. तसेच सवलतीच्या दरात आयपीओ शेअर्स मिळतील, असे आमिषही दाखवण्यात आले.

 

या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने एकूण ५६ लाख २५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. अॅपवरील डॅशबोर्डमध्ये त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सातत्याने वाढत असल्याचे दिसत होते. काही दिवसांनी त्यांच्या पोर्टफोलिओची किंमत तब्बल १० कोटी रुपये झाल्याचेही अॅपमध्ये दाखवण्यात आले.

मोठी रक्कम दिसल्यानंतर तक्रारदाराने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे मिळाले नाहीत. उलट, रक्कम खात्यात जमा करण्यासाठी आणखी ३० लाख रुपये ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ म्हणून भरण्याची मागणी आरोपींनी केली. अधिक पैसे भरण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराशी सर्व संपर्क तोडला आणि आधी गुंतवलेली रक्कमही परत केली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस पाटलांनी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या जाहिरातींवर आंधळा विश्वास ठेवू नये आणि कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्थेची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला अखेरचा सलाम! सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा, चाहत्यांना धक्का

Thursday, 30 July 2026, 11:42

ज्ञानज्योती शुभांगी गावडे… शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा अखंड तेवत राहिलेला दीपस्तंभ

Thursday, 30 July 2026, 11:13

पुण्यातील तरुणाला ऑनलाईन बुकिंग पडले महागात! डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या नादात मोठी फसवणूक, लाखों रुपये गायब

Thursday, 30 July 2026, 11:06

सोने स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्यांना धक्का; अमेरिकेच्या एका निर्णयाचा मोठा परिणाम

Thursday, 30 July 2026, 10:51

उद्धव ठाकरेंना न्यायालयाचा दणका? वसंत डावखरे प्रकरणात समन्स जारी,कोर्टात हजर राहणार?

Thursday, 30 July 2026, 10:35

विकासकामांच्या कोट्यवधींच्या बजेटमागे टक्केवारीचा खेळ; नगरसेवकांचा रेट ठरलेला?

Thursday, 30 July 2026, 10:34
Next Post

दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलनाचाण वणवा भडकणार! ई-२० इंधनाविरोधात देशभरातील वाहनचालकांचा संसदेवर मोर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.