Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीत पुन्हा एकदा आंदोलनाचाण वणवा भडकणार! ई-२० इंधनाविरोधात देशभरातील वाहनचालकांचा संसदेवर मोर्चा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 29 July 2026, 10:00

दिल्ली: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन शांत झाल्यानंतर राजधानीत पुन्हा एकदा आंदोलनाचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. यावेळी ई-20 इंधनाच्या वापराविरोधात देशभरातील वाहनचालकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर असोसिएशनने 4 ऑगस्ट रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने टॅक्सी चालक, खासगी वाहनधारक आणि इतर वाहनचालक सहभागी होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांना संसदेपर्यंत पोहोचण्यापासून रोखले होते. त्यामुळे वाहनचालकांच्या या मोर्चादरम्यानही पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय. वाहनचालकांचे म्हणणे आहे की, वाढलेल्या इथेनॉलच्या प्रमाणामुळे अनेक वाहनांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. इंजिनची कार्यक्षमता कमी होणे, वाहनांच्या सुट्या भागांवर परिणाम होणे आणि देखभाल खर्च वाढणे अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. विशेषतः पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनांवर चालणाऱ्या वाहनांवर त्याचा अधिक परिणाम होत असल्याचा दावा केला जात आहे.

 

दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर असोसिएशनचे अध्यक्ष संजय सम्राट यांनी सांगितले की, इथेनॉलमिश्रित इंधनामुळे वाहनांचे आयुष्य कमी होण्याची भीती वाहनचालकांमध्ये वाढत आहे. त्यामुळे लाखो वाहनमालक आर्थिक अडचणीत येऊ शकतात. त्यांनी केंद्र सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

संजय सम्राट यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही टीका करत वाहनचालकांच्या विविध प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. ई-20 इंधनाचा निर्णय पुन्हा एकदा विचारात घेऊन वाहनचालकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. आगामी मोर्चामुळे दिल्लीतील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असून, या आंदोलनाला सरकार कशाप्रकारे प्रतिसाद देते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

Wednesday, 29 July 2026, 13:28

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30
Next Post

भरपावसात चोरी केली! चोरीच्या रकमेची वाटणी करायला सुरक्षित ठिकाणी बसले अन् तेव्हाच झाला गेम, पिंपरीतील प्रकार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.