Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 29 July 2026, 12:39

पुणे: पुण्यातील फिटनेस क्षेत्रातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चतुःशृंगी पोलिसांनी जनवाडी परिसरात कारवाई करत एका जिम ट्रेनरकडून बेकायदेशीरपणे विकली जाणारी प्रतिबंधित इंजेक्शन्स जप्त केली आहेत. शरीरयष्टी वाढवण्यासाठी काही तरुणांकडून वापरल्या जाणाऱ्या ‘मेफेन्टरमाइन सल्फेट’ या औषधाची विनापरवाना विक्री सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी योगेश राजेंद्र वाडेकर (वय 37, रा. जनवाडी, पुणे) या जिम ट्रेनरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना जनवाडी परिसरातील महालक्ष्मी मेडिकलजवळ प्रतिबंधित औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने नियोजन करून घटनास्थळी छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी योगेश वाडेकर याच्याकडून ‘मेफेन्टरमाइन सल्फेट’ इंजेक्शनच्या 48 बाटल्या जप्त केल्या आहेत. कोणतीही वैद्यकीय परवानगी नसताना आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषधे विकली जात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

 

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, जिममध्ये येणाऱ्या तरुणांना कमी वेळेत आकर्षक शरीरयष्टी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही इंजेक्शन्स विकली जात होती. अधिक पैसे कमावण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

फिटनेस क्षेत्रात शरीर पटकन बनवण्याच्या नादात अनेक तरुण अशा धोकादायक औषधांच्या आहारी जातात. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा इंजेक्शन्सचा वापर केल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने तज्ज्ञांकडूनही याबाबत वारंवार सावधानतेचा इशारा दिला जातो.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी संबंधित जिम ट्रेनरविरोधात गुन्हा दाखल केला असून, ही इंजेक्शन्स कुठून आणली जात होती आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

Wednesday, 29 July 2026, 13:28

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30
Next Post

पुणे-पिंपरी चिंचवडच्या वाहतुकीचा कायापालट होणार! HCMTR आणि E-RTS प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.