Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 29 July 2026, 12:12

पुणे: पुण्यातील गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी धडक कारवाई करत संशयित अन्नपदार्थांचा तब्बल ४५ लाख ५० हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवणे, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव अशा विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

एफडीएच्या पथकाने गणेश पेठेतील वर्धमान एंटरप्रायझेसमध्ये तपासणी केली असता अन्नामलाई मिठाई, इमली जेली आणि लव्हली कँडी असा सुमारे ७ लाख ८२ हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या उत्पादनांवरील लेबलिंगमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या असून, ग्राहकांना आवश्यक माहिती देण्यात आलेली नव्हती. त्याच परिसरातील न्यू पांडियन एंटरप्रायझेसमधून सोनपापडी, चिक्की आणि रसमलाई बर्फी असा जवळपास ५९ हजार रुपयांचा मालही जप्त करण्यात आला.

भवानी पेठेतील गुरुनानक हायस्कूलजवळ असलेल्या माणिक सोहनलाल परमार यांच्या गोदामावर झालेल्या कारवाईत सर्वाधिक साठा आढळून आला. सेंटर फिल्ड कँडी आणि चॉकलेट वेफर रोल असा तब्बल ३६ लाख ३९ हजार रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान संबंधित गोदामाकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचेही स्पष्ट झाले.

नाना पेठेतील गोयल सेल्स कॉर्पोरेशनमधून काजू, बदाम, मनुका, मटण मसाला आणि मोहरी असा सुमारे ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या उत्पादनांमध्ये चुकीच्या ब्रँडिंगचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच विजय लक्ष्मी ट्रेडर्स येथून राईस ‘०’ नंबर शेव आणि फरसाणही जप्त करण्यात आले असून त्याचीही तपासणी सुरू आहे.

 

दरम्यान, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्येही एफडीएने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली आहेत. साताऱ्यातील न्यू सम्राट हॉटेल, हॉटेल केशर आणि हॉटेल लक्ष्मी गार्डन फॅमिली रेस्टॉरंट तसेच सांगलीतील मैत्री चायनीज सेंटर आणि हॉटेल ‘२५२० गावरान तडका’ या पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

याशिवाय सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात कृत्रिम दूध तयार करण्याचा प्रकारही उघडकीस आला. या कारवाईत पाच लिटर म्हशीचे दूध आणि भेसळीसाठी वापरले जाणारे सुमारे ४.४ किलो रिफाइंड पाम ऑइल जप्त करण्यात आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; ...अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp