Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत खळबळ..! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ई-मेल पाठवून जमीन नोंदी बदलण्याचा डाव फसला; ‘Protonmail’ वरून पाठवले खोटे आदेश; बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 26 June 2026, 13:04

बारामती, (पुणे) : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची खोटी ओळख निर्माण करून, अस्तित्वात नसलेल्या अधिकाऱ्याच्या नावे बनावट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड व आदेश तयार करून ते बारामती तहसीलला पाठवण्यात आल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या सायबर गुन्हेगारीप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महसूल नायब तहसीलदार स्वाती सुभाष गायकवाड (वय -52, रा. बारामती) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बारामती तहसील कार्यालयाच्या अधिकृत शासकीय ई-मेल आयडीवर “mahsulpune2@protonmail.com” या संशयास्पद ई-मेल आयडीवरून एक मेल प्राप्त झाला. या ई-मेलसोबत “उपविभागीय अधिकारी कार्यालय आदेश आणि तहसील कार्यालय आदेश प्रमाणे नाव नोंदणी करून स्थळ पाहणी करणे बाबत” या विषयाचे एक पत्र आणि काही संलग्न कागदपत्रे जोडलेली होती.

सदर पत्रावर “जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे (महसूल शाखा)” असा उल्लेख होता. तसेच त्यावर “पे. या. पदनूर, तहसीलदार महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे” असे नाव, पदनाम आणि हुबेहूब बनावट सही करण्यात आली होती. या बनावट पत्रामध्ये मौजे म्हसोबाचीवाडी (ता. बारामती) येथील गट क्रमांक 1 मधील 1 हेक्टर 20 आर या क्षेत्राबाबत गोविंद कोकरे यांच्या नावाची नोंद घेऊन समक्ष वहिवाटीच्या हद्दीची पाहणी करण्याबाबत बारामती तहसीलला सूचना देण्यात आल्या होत्या.

 

धक्कादायक बाब म्हणजे, या पत्रात थेट महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडील कथित ‘ई-ऑफिस’ संदर्भ क्रमांकाचा उल्लेख करून हे पत्र अगदी खरे असल्याचे भासवण्यात आले होते. हे ई-मेल आणि पत्र संशयास्पद वाटल्याने बारामतीचे कार्यतत्पर तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी या प्रकरणाची पडताळणी सुरू केली. त्यांनी तात्काळ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील मूळ महसूल शाखा तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून खात्री केली.

यावेळी mahsulpune2@protonmail.com” हा जिल्हाधिकारी कार्यालयाचा अधिकृत ई-मेल आयडी नाही, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात “पे. या. पदनूर” नावाचे कोणतेही कडक अधिकारी कार्यरतच नाहीत, तर जिल्हाधिकारी कार्यालयातून असे कोणतेही पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही. असे समजले. हा बनाव उघड होताच, तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कार्यालयीन आदेश (जावक क्र. आस्था/कावी/२६३/२०२६, ता. १९/०६/२०२६) अन्वये नायब तहसीलदार स्वाती गायकवाड यांना तात्काळ कडक फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, अज्ञात आरोपींनी संगनमताने शासकीय कार्यालयाचा, पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून बनावट दस्तऐवज तयार केले आणि शासकीय अभिलेखावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस हवादार गोरे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57
Next Post

अनेक नवसांनंतर झाली सिया पण तिच्या 'त्या' सवयीमुळे नातेवाईकही ठेवायचे अंतर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.