Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 July 2026, 18:34

पुणे, ता. 24 : पुणे जिल्ह्यातील अनेक सीएनजी पंपांवर गेल्या महिनाभरापासून एमएनजीएलच्या (Maharashtra Natural Gas Limited) पाइपलाइनमधील कमी गॅस दाबामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, वाहनचालकांसह सीएनजी डीलर्सही मोठ्या संकटात सापडले आहेत. वाहनांच्या लांबलचक रांगा, शहरात वाढलेली वाहतूक कोंडी, सीएनजी वितरण क्षमतेत मोठी घट आणि डीलर्सचे आर्थिक नुकसान यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा आरोप पेट्रोल डीलर्स असोसिएशन, पुणे (PDAP) ने केला आहे.

पीडीएपीने एमएनजीएलच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, गेल्या अनेक आठवड्यांपासून समस्या कायम असतानाही ग्राहक किंवा प्रशासनाला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे. परिणामी, संतप्त ग्राहकांचा रोष सीएनजी पंप चालकांना सहन करावा लागत असून, वाहतूक कोंडीबाबत पोलीस आणि वाहतूक विभागाकडूनही डीलर्सनाच जबाबदार धरले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

पीडीएपीच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्षात ही परिस्थिती एमएनजीएलच्या पाइपलाइनमधील कमी गॅस दाबामुळे निर्माण झाली असून, डीलर्सचा त्यामध्ये कोणताही दोष नाही. त्यामुळे एमएनजीएलने तातडीने गॅसचा दाब पूर्ववत करावा, ग्राहकांसाठी अधिकृत प्रेस नोट जारी करावी आणि जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे पोलीस व वाहतूक पोलिसांना ही परिस्थिती डीलर्सच्या चुकीमुळे नसल्याचे अधिकृतपणे कळवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

पीडीएपीचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले, “गेल्या महिनाभरापासून सीएनजी डीलर्सना त्यांच्या नियंत्रणाबाहेरील समस्येची मोठी किंमत मोजावी लागत आहे. आमच्या सदस्यांना आर्थिक फटका, ग्राहकांचा रोष आणि पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे, तर एमएनजीएल मात्र मौन बाळगून आहे. पायाभूत सुविधांतील त्रुटीची शिक्षा डीलर्सना देणे अन्यायकारक आहे. एमएनजीएलने तातडीने गॅसचा दाब पूर्ववत करून वस्तुस्थिती ग्राहक आणि प्रशासनासमोर स्पष्ट करावी.”

दरम्यान, पीडीएपीने एमएनजीएलला स्पष्ट इशारा दिला आहे. पुढील 24 तासांत गॅसचा दाब पूर्ववत न केल्यास प्रभावित सीएनजी पंपांना समस्या सुटेपर्यंत सीएनजी विक्री तात्पुरती बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे संघटनेने म्हटले आहे.

एमएनजीएलच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे डीलर्सचे आर्थिक नुकसान, ग्राहकांची गैरसोय आणि प्रशासकीय कारवाईचा वाढता ताण आता असह्य झाल्याचे सांगत, या संपूर्ण परिस्थितीची जबाबदारी एमएनजीएलने स्वीकारावी, अशी ठाम भूमिका पीडीएपीने घेतली आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57
Next Post

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.