Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad News : बोपगावमध्ये ‘हॉर्न’ वाजवल्यावरून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत दगडाने फोडले डोके ; सासवड पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 15 June 2026, 16:09

सासवड, (पुणे) : सासवड-बोपगाव रस्त्यावरील कानिफनाथ कमानीजवळ गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून तीन जणांनी मिळून एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. शनिवारी (ता. 06) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली. याप्रकरणी तिघांवर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण शिवाजी बालगुडे (वय-32, व्यवसाय- नोकरी, रा. मुर्टी, ता. बारामती) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गोट्या अक्षय खेनट उर्फ संभाजी रा. पिंपळे ता. पुरंदर, गणेश नवनाथ कामथे, प्रसाद मारुती कामथे दोघे (रा. चांबळी ता. पुरंदर) असे मारहाण करणाऱ्या तिघांची नावे आहेत. याबाबत बालगुडे यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण बालगुडे हे सासवड-बोपगाव रस्त्यावरून त्यांच्या मोटारसायकलवरून जात होते. बोपगाव गावच्या हद्दीतील चौकात कानिफनाथ कमानीजवळ आले असता, त्यांनी समोरील वाहनाला हॉर्न वाजवला. मात्र, हॉर्न वाजवल्याचा राग मनात धरून समोरून येणाऱ्या आरोपींनी आपली मोटारसायकल फिर्यादी बालगुडे यांच्या मोटारसायकलला थेट आडवी मारली आणि रस्ता अडवला.

 

गाडी आडवी मारल्यानंतर आरोपींनी कोणतीही शहानिशा न करता लक्ष्मण बालगुडे यांना गाडीवरून खाली खेचले आणि शिवीगाळ सुरू केली. वाद वाढत गेल्यानंतर आरोपी गोला उर्फ अक्षय संभाजी खेनट (उर्फ गोट्या) याने रस्त्याकडेला पडलेला एक मोठा दगड हातात घेतला आणि थेट लक्ष्मण यांच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात लक्ष्मण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, त्याच वेळी त्याचे इतर दोन साथीदार गणेश कामथे आणि प्रसाद कामथे यांनी लक्ष्मण यांना जमिनीवर पाडून हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर जिवे मारण्याची धमकी दिली. आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार होळकर करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पहाटे गोळीबार! वानवडीत पोलीस-गुन्हेगार चकमक; 30 हून अधिक गुन्हे असलेल्या सराईतावर पोलिसांचा गोळीबार

Sunday, 21 June 2026, 13:38

इंदापुरात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने ठेचून निर्घृण खून; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

Sunday, 21 June 2026, 12:59

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक नंदकुमार कोळी यांची नियुक्ती

Sunday, 21 June 2026, 12:48

कुरकुंभच्या ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’ला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; 48 तासांत वीज-पाणी तोडण्याचे आदेश

Sunday, 21 June 2026, 12:38

येरवडा मनोरुग्णालयात फक्त एका ‘चादरीवरून’ वाद झाला अन् घडलं भयंकर…

Sunday, 21 June 2026, 12:32

पुण्यात ‘मी इथला भाई’, म्हणत नागरिकांना धमकावणाऱ्या गुंडाचा राडा; पाहा व्हायरल व्हिडीओ

Sunday, 21 June 2026, 11:49
Next Post

"कुणी बी समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास" निवडणुकांचा पत्ता नाही, पण पूर्व हवेलीतील 'भावी' सदस्यांचा फिल्मी डायलॉग्स आणि रिल्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुरळा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.