Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 23 July 2026, 18:43

इंदौर: इंदौरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिचा जामीन रद्द करत तिला तीन आठवड्यांच्या आत संबंधित न्यायालय किंवा पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा खटला शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देत, सहा महिन्यांत सुनावणी पूर्ण न झाल्यास सोनमला पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा दिली आहे.

सोनमच्या जामिनाविरोधात मेघालय सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, खटल्याचा निकाल विनाकारण लांबू नये आणि पुढील सहा महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. जर या कालावधीत खटला पूर्ण झाला नाही, तर आरोपीला पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याचा अधिकार राहील.

यापूर्वी ३० जून रोजी मेघालय उच्च न्यायालयाने सोनमचा जामीन कायम ठेवला होता. अटक प्रक्रियेदरम्यान कायदेशीर त्रुटी झाल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मेघालय सरकारची याचिका फेटाळली होती. मात्र, या निर्णयाला आव्हान देत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

 

सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले की, अटक कागदपत्रांमध्ये हत्या प्रकरणाशी संबंधित कलमाचा क्रमांक टाइप करताना झालेली चूक ही केवळ तांत्रिक स्वरूपाची होती. अशा किरकोळ त्रुटीच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन देणे योग्य नसल्याचे त्यांनी न्यायालयासमोर मांडले. आरोपीला जामीन कायम राहिल्यास ती फरार होण्याची शक्यताही सरकारने व्यक्त केली.

राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे लग्नानंतर हनीमूनसाठी मेघालयात गेले होते. तपास यंत्रणांच्या आरोपानुसार, सोनमने पतीला एका निर्जन ठिकाणी नेले, जिथे तिच्या प्रियकराने पाठवलेल्या तिघांनी राजाची हत्या केली आणि मृतदेह दरीत फेकून दिला. मात्र, सोनमने सर्वोच्च न्यायालयात स्वतःला निर्दोष असल्याचा दावा केला. तिच्याविरुद्धचा खटला परिस्थितिजन्य पुराव्यांवर आधारित असून, केवळ संशयाच्या आधारे दोषी ठरवता येणार नाही, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी केला.

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सोनमच्या वकिलांसमोर स्वेच्छेने शरण जाणे किंवा जामीन रद्द होणे, असे दोन पर्याय ठेवले होते. अखेर न्यायालयाने तिचा जामीन रद्द करत तीन आठवड्यांच्या आत शरण येण्याचे स्पष्ट आदेश दिले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.