Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सासवड येथे कर्जाचा हफ्ता मागण्यासाठी गेलेल्या फायनान्स कर्मचाऱ्याला “कोयत्याने मारून टाकण्याची” धमकी, कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 2 March 2026, 13:01

सासवड, ता. 02 : कर्जाच्या हप्त्याची चौकशी( Saswad) करण्यासाठी गेलेल्या फायनान्सच्या कर्मचाऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण करीत “कोयत्याने मारून टाकतो” अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इनामके मळा परिसरात हि घटना घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलींद महादेव इनामके, अक्षय महादेव इनामके (दोन्ही रा. इनामकेमळा, सासवड ता. पुरंदर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तन्मय अनिल काळे (व्यवसाय – इक्वीटास स्मॉल फायनान्स बँकेमध्ये नोकरी, रा. 495 नवजिवन सोसायटी, सहकार नगर नं -1 प‌द्मावती, सासवड, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे हे बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांकडून हप्ते वसूल करण्याचे काम करतात. हडपसर ते पुरंदर दरम्यानच्या ग्राहकांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता ते सासवडकडे निघाले होते. दुपारी अडीच वाजता तो अक्षय इनामके यांच्या घरी हप्त्याबाबत चौकशीसाठी गेले होते.

 

इनामके यांनी हुंडाई एलॅन्ट्रा (MH 12 PC 6226) या कारचे कर्ज घेतले असून हप्ता थकीत होता. मात्र, घरी भेटलेल्या त्यांचा भाऊ मिलिंद महादेव इनामके यांनी “आमच्याकडे अशी गाडी नाही” असा दावा केला. यानंतर फोनवर अक्षय इनामके यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सध्या केरळमध्ये असल्याचे सांगत दोन दिवसांत हप्ता भरण्याचे आश्वासन दिले.

प्रकरण वाढले आणि मिलिंद इनामके यांनी बँकेच्या कलेक्शन मॅनेजरशी फोनवर वाद घालत असताना संतापाच्या भरात काळे यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर गोठ्यातील कुऱ्हाडीच्या दांड्याने पाठ, कंबर, मांड्या, पोटरी, घोटे आणि उजव्या हाताच्या मनगटावर बेदम मारहाण करण्यात आली. “तुला कोयत्यानेच मारून टाकतो” अशी धमकीही देण्यात आली.

फोनवरून वरिष्ठ अधिकारी विनवण्या करत असतानाही मारहाण सुरूच असल्याचे सांगितले जाते. अखेर शाखा व्यवस्थापक कपिल दिलीप पोमण यांच्या हस्तक्षेपानंतर काही वेळाने कर्मचाऱ्याला सोडण्यात आले. जखमी काळे यांना तत्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मोबाईलमधील रेकॉर्ड केलेल्या कॉन्फरन्स कॉलमध्ये अक्षय इनामके यांनी “त्याला सोडू नको, धरून ठेव” असे सांगितल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पीडित कर्मचाऱ्याने सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सासवड पोलीस करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23

दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा भलताच ‘धंदा’! पुणे पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली अन् समोर आला भयंकर प्रकार…

Wednesday, 22 July 2026, 15:16

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोत हायटेक सुविधा! काही सेकंदांत मिळणार डिजिटल तिकीट

Wednesday, 22 July 2026, 15:11

‘ताई इथं चोर फिरता, तुमचे दागिने काढून ठेवा’ म्हणाले अन् क्षणात दागिने गायब; जेजुरीत भरदिवसा घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 14:47

NEET पेपरफुटी तपासात मोठा स्फोट! CBI च्या 4 प्रश्नांनी प्राध्यापक गार,तब्बल 6तास चौकशी ; मोबाईल जप्त

Wednesday, 22 July 2026, 14:45
Next Post

Crime News: संतापजनक! तान्ह्या बाळाच्या आईची विक्री अन् बळजबरीने लग्न; 300 ग्रामस्थांचा वेढा मोडीत काढून पोलिसांनी 'अशी' केली सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.