Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्ग रुंदीकरणाच्या मोजणीला कुंजीरवाडी ग्रामस्थांचा विरोध! भूसंपादनापूर्वी संयुक्त बैठक घेऊन गटनिहाय माहिती; नकाशा व मोबदल्याचा तपशील देण्याची मागणी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 28 September 2026, 15:54

लोणी काळभोर, ता. 28 : पुणे-सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी प्रस्तावित भूसंपादनाच्या मोजणीला कुंजीरवाडी येथील ग्रामस्थ, बाधित शेतकरी, व्यावसायिक व रहिवाशांनी हरकत घेतली आहे. 28 सप्टेंबर रोजी होणारी मोजणी स्थगित करून प्रथम सर्व संबंधितांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि भूमी अभिलेख विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुणे-सोलापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कुंजीरवाडी येथे भूसंपादन मोजणीची नोटीस देण्यात आली आहे. मात्र, मोजणीपूर्वी कोणत्या गट क्रमांकातील किती जमीन संपादित होणार, महामार्गाची प्रस्तावित रुंदी किती असेल, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना किती क्षेत्र जाणार आणि बाधितांना कोणत्या पद्धतीने मोबदला मिळणार, याची स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

2002-03 मध्ये झालेल्या जुन्या रुंदीकरणाचा मुद्दाही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. त्यावेळी काही शेतकऱ्यांची मूळ भूसंपादनापेक्षा अधिक जमीन रस्त्यात गेल्याचा, काहींना अत्यल्प मोबदला मिळाल्याचा तर काहींना अद्याप मोबदला मिळालेला नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. जुन्या भूसंपादनाची मोजणी, नोंदी, प्रत्यक्ष ताबा आणि मोबदल्याची शासनाने तपासणी करून प्रलंबित मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच रस्त्यासाठी जमीन गेल्यानंतरही काही शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर संबंधित क्षेत्राची योग्य नोंद किंवा कपात झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे जुन्या भूसंपादनाची प्रथम तपासणी करून त्यानंतरच सातबारा नोंदीबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नवीन भूसंपादनामुळे शेतकरी, दुकानदार, व्यावसायिक आणि रहिवाशांच्या उपजीविकेवर होणारा परिणाम, तसेच बाधित होणाऱ्या दुकानांसाठी पुनर्वसन, पर्यायी व्यवस्था आणि मोबदल्याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

 

दरम्यान, हडपसर ते यवत या संपूर्ण पट्ट्यातील बाधित शेतकरी, व्यावसायिक व रहिवाशांची संयुक्त बैठक घेऊन प्रकल्पाचा नकाशा, प्रस्तावित रस्त्याची रुंदी, गटनिहाय संपादन क्षेत्र आणि मोबदल्याची प्रक्रिया स्पष्ट केल्यानंतरच पुढील मोजणी व भूसंपादनाची कार्यवाही करावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन; ९६ टक्के शेतकऱ्यांची जमिनीला संमती, मात्र पारगावमधील विरोध कायम

Tuesday, 20 October 2026, 23:00

पुणे घाटमाथा, कोकणासह ‘या’ ९ जिल्ह्यांत हवामान बदलणार; ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता!

Tuesday, 20 October 2026, 21:51

‘हा पाकिस्तान, श्रीलंका नव्हे, घरात घुसून मारणारा भारत’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Tuesday, 20 October 2026, 21:46

पिंपरी दुमाल्यात रावण दहनातून दुष्काळाच्या अंतासाठी आई जगदंबेला साकडे

Tuesday, 20 October 2026, 21:19

रावण दहनाने यवत येथे नवरात्र उत्सवाची सांगता; धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सव उत्साहात साजरा

Tuesday, 20 October 2026, 21:15

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50
Next Post

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp