Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर भूमी अभिलेख विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी नागरिक आक्रमक

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 14 November 2026, 12:11

शिरूर: पुणे जिल्ह्यातील हवेली भूमी अभिलेख विभागातील कथित गैरव्यवहारांची गंभीर दखल घेऊन ४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीचा निर्णय शासन स्तरावर झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता शिरूर भूमी अभिलेख विभागातील कारभाराचीही सखोल चौकशी होणार का, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. हवेलीप्रमाणेच शिरूर भूमी अभिलेख कार्यालयाचीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

जमिनीची मोजणी, हद्द निश्चिती, क-प्रत, नकाशे आणि जमीनविषयक अभिलेख ही सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याची कामे असतात. मात्र, शिरूर भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराबाबत अनेक गंभीर तक्रारी आणि प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक क-प्रतींवर हरकती प्रलंबित असतानाही त्या नियमित केल्या जात असल्याचे आरोप आहेत. शेजारील जमीनधारकांची संमती अथवा आवश्यक स्वाक्षऱ्या नसतानाही क-प्रत तयार करून दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच मोजणीच्या प्रक्रियेत वशिलेबाजी, काही प्रकरणांत अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन निर्णय घेणे आणि अधिकारांचा कथित गैरवापर होत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या सर्व बाबींची वस्तुनिष्ठ चौकशी होण्याऐवजी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाचा कारभार नेमका कोणाच्या हितासाठी चालतोय? सर्वसामान्य नागरिकांसाठी की धनदांडग्यांच्या सोयीसाठी? असा बोचरा सवाल उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेलीचे आमदार आणि आंबेगाव-शिरूरचे आमदार यांनी विशेष जनता दरबाराचे आयोजन करून भूमी अभिलेख विभागासंदर्भातील नागरिकांच्या तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घ्याव्यात, अशी चौफेर मागणी तालुक्यातून होत असून, प्रलंबित हरकती, वादग्रस्त क-प्रती, संशयास्पद मोजण्या आणि अधिकारांचा गैरवापर अशा प्रकरणांची स्वतंत्रपणे चौकशी करण्याची गरज आहे. असे अनेक पीडित शेतकऱ्यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’शी बोलताना स्पष्ट केले.

हवेलीमध्ये ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चौकशीची होत असेल, तर शिरूरमधील तक्रारींकडे प्रशासन डोळेझाक का करत आहे? वरिष्ठ जिल्हा प्रशासन, भूमी अभिलेख विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि महसूलमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी. केवळ चौकशीचे आदेश देऊन न थांबता दोषी आढळणाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करावी. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी आणखी किती कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहील.

हवेलीप्रमाणे शिरूर भूमी अभिलेख विभागाचीही झाडाझडती होणार की पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या तक्रारी फाईलमध्येच धूळ खात पडणार? हा विषय आता ‘पब्लिक इंटरेस्ट’ बनला असून, शासन स्तरावर शिरूरच्या भूमी अभिलेख विभागासंदर्भात कोणती कारवाई केली जाते हे पाहणे मोठ्या उत्सुकतेचे ठरणार आहे.

” चांडोह (ता.शिरूर) गावातील शेतकऱ्यांचे जमिनीच्या हद्दीवरून सुरू असलेले वाद कायमचे मिटविण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन लेखी निवेदन देणार असून, शासन निर्णयानुसार गटवारी व गटनकाशे उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी करणार आहोत.”
– शांताराम पानमंद (सामाजिक कार्यकर्ते, चांडोह)

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मारुती नवलेंच्या अडचणीत मोठी वाढ! सहकुटुंब डेक्कन पोलीस ठाण्यात हजेरी; ‘त्या’ प्रकरणात मोठी कारवाई होणार?

Saturday, 14 November 2026, 18:36

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंच्या अडचणी वाढणार?दीड कोटींच्या अलिशान गाडीवर संशय, चौकशीची मागणी

Saturday, 14 November 2026, 17:37

पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ! 15 हजार मतदारांच्या नावांशी हेराफेरी; निवडणुकीपूर्वी खळबळ

Saturday, 14 November 2026, 17:09

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर! राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी, भाजपच्या मॅरेथॉनला ठेंगा..

Saturday, 14 November 2026, 16:40

मनोज जरांगेंचा पुन्हा ऑडिओ बॉम्ब! 500 कोटींनंतर आता नवा गौप्यस्फोट,फडणवीस-शिंदे अडचणीत?

Saturday, 14 November 2026, 16:07

हडपसरची कोट्यवधींची शूटिंग रेंज धूळखात! हजारो नेमबाजांचे भविष्य टांगणीला; अमोल नाना तुपे मैदानात, रेंज सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका!

Saturday, 14 November 2026, 16:01
Next Post

पुण्यातील प्रसिद्ध ‘वैशाली’ आणि ‘रूपाली’ रेस्टॉरंटवर FDA ची कारवाई; अन्न व्यवसाय परवाने निलंबित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp