Saturday, November 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील प्रसिद्ध ‘वैशाली’ आणि ‘रूपाली’ रेस्टॉरंटवर FDA ची कारवाई; अन्न व्यवसाय परवाने निलंबित

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 14 November 2026, 13:02

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध एफसी रोडवरील ‘वैशाली’ आणि ‘रूपाली’ या रेस्टॉरंटना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठा दणका दिला आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न केल्याचे तपासणीत आढळल्यानंतर दोन्ही रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील खाद्यप्रेमी आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत 13 नोव्हेंबर रोजी एफसी रोड परिसरातील या दोन्ही रेस्टॉरंटची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्नपदार्थांची साठवणूक, स्वच्छता आणि खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यात अनेक त्रुटी समोर आल्याची माहिती FDA कडून देण्यात आली.

वैशाली रेस्टॉरंटच्या तपासणीत 98 पैकी केवळ 58 गुण मिळाले. काही खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवल्याचे आढळले. तसेच डोसा आणि उत्तप्पा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा तवा स्वच्छतागृहाच्या शेजारी असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले. अन्न तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छतेबाबत योग्य काळजी घेतली जात नसल्याचेही स्पष्ट झाले.

दुसरीकडे, रूपाली रेस्टॉरंटमध्येही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. तेथील काही खाद्यपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवलेले नव्हते. तसेच काही पदार्थांवर वापरण्याची अंतिम तारीख नमूद करण्यात आली नव्हती.

या त्रुटी दूर केल्यानंतर दोन्ही रेस्टॉरंटची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. FDA कडून लेखी परवानगी मिळेपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री, पार्सल आणि घरपोच सेवा सुरू करता येणार नाही. त्यामुळे या दोन्ही रेस्टॉरंटना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या तपासणीची आणि मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ! 15 हजार मतदारांच्या नावांशी हेराफेरी; निवडणुकीपूर्वी खळबळ

Saturday, 14 November 2026, 17:09

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर! राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी, भाजपच्या मॅरेथॉनला ठेंगा..

Saturday, 14 November 2026, 16:40

मनोज जरांगेंचा पुन्हा ऑडिओ बॉम्ब! 500 कोटींनंतर आता नवा गौप्यस्फोट,फडणवीस-शिंदे अडचणीत?

Saturday, 14 November 2026, 16:07

हडपसरची कोट्यवधींची शूटिंग रेंज धूळखात! हजारो नेमबाजांचे भविष्य टांगणीला; अमोल नाना तुपे मैदानात, रेंज सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका!

Saturday, 14 November 2026, 16:01

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुहूर्त ठरणार? सुनेत्रा पवार-फडणवीसांची 2 तास गुप्त बैठक; निवडणुकीआधी राजकीय घडामोडींचे संकेत!

Saturday, 14 November 2026, 15:18

पुण्यात जमीन माफियांचा कारनामा! बनावट सह्या, खोटी ओळखपत्रे वापरून कोट्यवधींची शेती हडपली..

Saturday, 14 November 2026, 14:51
Next Post

पुण्यात मद्याच्या होम डिलिव्हरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; बनावट वेबसाइटद्वारे 20 ग्राहकांना गंडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp