Pune Police News : पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. शहरातील सर्व पोलीस चौक्या २४ तास आणि सातही दिवस सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. प्रत्येक पोलीस चौकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. (Pune Police News)
Pune Police News : पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. शहरातील सर्व पोलीस चौक्या २४ तास आणि सातही दिवस सुरू ठेवण्याचा मोठा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. प्रत्येक पोलीस चौकी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. शिवाय अजून १५० बीट मार्शल वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील २५ बीट मार्शल दामिनी पथकासाठी असणार आहेत. याशिवाय कोणत्याही तक्रारीकडे कानाडोळा न करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. (Pune Police News)
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्याच्या मध्यवर्ती भागात काल एका तरुणीवर दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. को.ता गॅंगची दहशत वाढतच आहे. त्यातच दर्शना पवार हत्याकांडाने पुणे हादरलेले असतानाच हा प्रकार समोर आल्याने पुणेकर चिंतीत आहेत. पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून, एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Pune Police News)
दरम्यान, एमपीएससीमध्ये राज्यात सहावी आलेली दर्शना पवार हीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एमपीएससीच्या विद्यार्थांचे समुपदेशन करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी स्वतंत्र वर्ग चालवण्यात येणार आहे, असे पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितलं. (Pune Police News)