Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आजच्या नव्हे, पुढील 25 वर्षांच्या विजेचे नियोजन! हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची मागणी – आमदार माऊली आबा कटके

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 20 November 2026, 17:13

लोणी काळभोर, ता. 20 : हवेली तालुक्यात झपाट्याने वाढणारे नागरीकरण, औद्योगिक विस्तार, नवीन गृहप्रकल्प आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील विजेची गरज भागविण्यासाठी स्वतंत्र ‘हवेली वीज वितरण विभाग’ निर्माण करण्यात यावा, अशी मागणी शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांनी केली आहे. आजच्या विजेच्या गरजांपुरते मर्यादित न राहता पुढील २५ वर्षांचे नियोजन करून वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

यासंदर्भात आमदार कटके यांनी महावितरण पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता पंकज तगलपल्लेवार यांची भेट घेऊन चर्चा केली. मुळशी वीज वितरण विभागाचे विभाजन करून हवेलीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करावा आणि तो तातडीने मंजुरीसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालयातील प्रकाशगड (मुंबई) येथे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.

हवेली तालुक्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर अनेक पायाभूत प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. लोणी काळभोर येथील ईएचव्ही उपकेंद्राचे काम पूर्ण करणे, वाघोली परिसरातील प्रस्तावित दोन ईएचव्ही उपकेंद्रांची उभारणी, शिंदवणे सबस्टेशन कार्यान्वित करणे आणि पेरणे सबस्टेशनचे काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी पाठपुरावा केला.

याशिवाय कोरेगाव मूळ आणि उरुळी कांचन येथे नवीन सबस्टेशन उभारणे, आवश्यक फीडर्सची निर्मिती करणे, प्रलंबित वीज जोडण्या तातडीने मंजूर करणे, तसेच शासनाच्या सौर ऊर्जा योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांना मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

‘पुढील 25 वर्षांचा विचार आवश्यक’
आमदार माऊली आबा कटके म्हणाले, “हवेली तालुक्याचा झपाट्याने विस्तार होत असून आगामी काळात लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्र आणि गृहप्रकल्पांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे केवळ आजच्या विजेच्या गरजांचा विचार करून चालणार नाही, तर पुढील 25 वर्षांचे नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, तसेच भविष्यात पायाभूत सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र हवेली वीज वितरण विभागाची मागणी केली आहे.”

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57

तुळशी विवाह कधी? २१ नोव्हेंबर की २० नोव्हेंबर? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी

Friday, 20 November 2026, 18:31

पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडण्यासाठी ३१ किमीची जमिनीखालील रस्ता बोगदा प्रणाली; बीकेसी, विमानतळ आणि द्रुतगती महामार्ग थेट जोडले जाणार!

Friday, 20 November 2026, 18:30

अजितदादांच्या अपघातावर रोहित पवार आक्रमक! सरकारला थेट अल्टिमेटम, ‘आजच नार्को टेस्ट करा’; नव्या दाव्याने खळबळ!

Friday, 20 November 2026, 18:12

इंदापुरात २५ नोव्हेंबरला भाजपच्या मोर्चाला राष्ट्रवादीचे प्रतिआव्हान! तहसीलदारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काढणार प्रतिमोर्चा

Friday, 20 November 2026, 17:47

इराण-अमेरिका संघर्षात भारतीय जहाजांना लक्ष्य! 9 जहाजांवर विशेष नजर, केंद्र सरकारने वाढवली सुरक्षा!

Friday, 20 November 2026, 17:33
Next Post

एमआयटी प्रशासनाच्या चुकीमुळे लिफ्टमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनीची 14 तासानंतर सुटका...! लाखोंची फी, पण सुरक्षेच्या नावाने बोंब! दोषींवर कारवाई कधी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp