Pimpri News : पिंपरी, (पुणे) : एका राष्ट्रीयकृत बँकेच्या मॅनेजरला त्याचे व्हिडिओ चॅट आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अडीच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका पुरुषाला व एका महिलेला गुन्हे शाखेच्या पथकाने एकाला ताब्यात घेतले आहे.
गुन्हा दाखल
गणेश लक्ष्मण कोळी आणि एका महिला असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक मॅनेजरला त्याचे व्हिडिओ चॅट आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एक महिला आणि एका पुरुषाने अडीच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीसांच्या खंडणी विरोधी पोलीस पथकाने गणेश लक्ष्मण कोळी आणि एका महिलेस खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता भोसरी पोलीस करत आहेत.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बॅटरी चोरणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलीसांच्या गुन्हे शाखा दोन पथकाने दोन अल्पवयीनसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
ओंकार सुरेश पवार आणि जफर जैद सिद्दिकी असे अटक केलेल्यांची नावे आहेत. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेरा बॅटरी चोरी करण्यासाठी ही टोळी दुचाकी चोरी देखील करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत लोकांच्या सुरक्षा करिता मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र काही चोर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही कॅमेरासाठी लावण्यात आलेल्या बॅटरी मोठया प्रमाणात चोरी करत असल्याच्या तक्रारी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, गुन्हे शाखा दोन पोलीस पथकाने या दोन्ही संशयितांकडून एकूण चार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. त्यातून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.