गणेश सुळ
केडगाव : गोपाळ समाजहित महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे दि.२४ रोजी मनोमिलन तथा राज्य कार्यकारणी पुनर्गठन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीअध्यक्ष पदी संजय गव्हाणे, उपाध्यक्ष पदी संतोष मोरे, कार्याध्यक्षपदी नंदकुमार पवार, सचिव पदी शेकूराव वाणी आणि कोअर कमिटी सदस्य यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात भटक्या विमुक्त जाती जमातींच्या लोकांना स्वातंत्र्याची ७३ वर्ष उलटून देखील अन्याय अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. विविध भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेच्या माध्यमातून गोपाळ समाजातील नंदकुमार पवार हे बऱ्याच वर्षांपासून समाजासाठी काम करत आहेत. कुटुंबातील गरीब परिस्थितीतुन शिक्षण पूर्ण केले, असून पवार हे विखुरलेल्या समाजाला संघटीत करून समाजहिताचे कार्य मोठ्या जोमाने करत आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पद, तसेच प्रदेशाध्यक्ष पद देखील भूषवले आहे.
भटक्या विमुक्त जातीसाठी अनेक आयोग नेमले गेले, त्या आयोगाने केंद्र सरकाकडे शिफारशी देखील पाठवल्या परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारने भटक्या विमुक्तांसाठी आयोग लागू केला नाही. आयोगाच्या शिफारशी देखील लागू केल्या नाहीत. परिणामी आजही भटक्या विमुक्तांचे जीवन हे कसरतीचे आहे. सर्वप्रथम यासाठी मी हे काम हाती घेणार असून येणाऱ्या काळामध्ये समाजासाठी विविध उपाय योजना व समाज कसा घडेल. या दृष्टीने काम करणार आहे. असा ठाम विश्वास यावेळी नंदकुमार पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी राज्य अध्यक्ष सुभाष गव्हाणे, उपाध्यक्ष गोविंद गव्हाणे, सचिव भरत गव्हाणे, संपर्क प्रमुख संजय भोसले, मारुती गव्हाणे, गोपाल तागड, राजू गव्हाणे, आंबदास वाणी, शेषराव मोरे, बालाजी घोडके, देवेंद्र धनगरे, रविभाऊ गव्हाणे, शांताराम गायकवाड, बबन वाणी, शंकर कालापाड, विजय महाजन आदी उपस्थित होते.