Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सासरच्या छळाला कंटाळून डाळिंब येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासू-सासऱ्यासह 6 जणांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 10 June 2026, 13:43

राहुलकुमार अवचट

यवत, (पुणे) : सासरच्या लोकांकडून होणारा शारीरिक, मानसिक छळ व बेदम मारहाण आणि स्वतःच्या सासऱ्यानेच टाकलेली वाईट नजर या त्रासाला कंटाळून एका 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवी अजिंक्य कांबळे (वय 25, रा. डाळिंब, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. 09) सकाळी साडेआठ वाजता घडली.

पती अजिंक्य भाऊसो कांबळे, सासरे भाऊसो कांबळे, सासू लक्ष्मीबाई कांबळे, दीर स्वप्नील भाऊसो कांबळे, अजिंक्यच्या आत्याचा मुलगा, शेखर भोसले रा. डाळिंब, ता. दौंड), कदम (पूर्ण नाव माहीत नाही, उरुळी कांचन येथील मध्यस्थी सासऱ्याचा मित्र) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. याबाबत मुलीची आई आशा संतोष साबळे (वय -45, रा. देवाळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा साबळे यांची मोठी मुलगी वैष्णवी हिचे लग्न 15 जून 2022 रोजी डाळिंब येथील अजिंक्य कांबळे याच्याशी झाले होते. सुरुवातीला संसार सुरळीत चालला होता; मात्र काही दिवसांतच पती अजिंक्य याला दारूचे व्यसन जडले आणि त्याचे दुसऱ्या एका महिलेशी अनैतिक संबंध सुरू झाले. यावरून पती-पत्नीत वाद सुरू झाले.

 

दारू पिऊन पती अजिंक्य हा वैष्णवीला “तुझे आईने लग्नामध्ये काही दिले नाही, लग्नाचा सगळा खर्च आम्हीच केला” असे टोमणे मारून मारहाण व छळ करू लागला. तसेच वैष्णवीचे सासरे भाऊसाहेब कांबळे हे देखील वैष्णवीवर वाईट नजरेने बघत असत आणि तिला मानसिक त्रास देऊन मारहाण करत असत. असे फिर्यादीत म्हटले आहे.

सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता वैष्णवीने आईला फोन केला. तिने सांगितले की, रविवारी मला व जाऊला सासू, सासरे, आणि पती हे वारंवार मारहाण करतात असे सांगितले होते. असे सांगितल्याने भांडण मिटवण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी आणि मध्यस्थीने बेदम मारले होते. त्यामुळे वैष्णवी बेशुद्ध पडली होती. तसेच उपचारासाठी दवाखान्यातही नेले नाही.

मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादी आशा साबळे या मुलीला भेटण्यासाठी डाळिंब येथे जाण्यास निघाल्या. त्या देवळाली प्रवरा बसस्टँडवर असतानाच जावई अजिंक्य कांबळे याचा फोन आला आणि त्याने “तुम्ही इकडे येत आहात का? वैष्णवीने फाशी घेतलेली आहे,” असे सांगितले. फिर्यादी तात्काळ बसने यवतच्या सरकारी दवाखान्यात पोहोचली; मात्र तोपर्यंत वैष्णवीचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, मृत वैष्णवीला संगनमताने वेळोवेळी उपाशीपोटी ठेवून, गंभीर मारहाण करून आणि शारीरिक-मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी यवत पोलिसांनी पती, सासू, सासरे, दीर, व अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21
Next Post

पूर्व पुण्यातील पाणीकपात रद्द; नागरिकांना दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp