Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 31 August 2026, 9:21

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनुसूचित जातींच्या भावना दुखावल्याचा आरोप करत अमित कुमार नावाच्या स्थानिक तरुणाने ही तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर घडलेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर 8 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाची एक मोठी सभा पार पडली होती, ज्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. या सभेनंतर एका स्थानिक हिंदू संघटनेने त्या जागेवर शुद्धीकरण विधी केला. मैदानातील अस्वच्छता दूर करण्यासाठी आणि तिथे दिलेल्या घोषणांचा निषेध म्हणून हे शुद्धीकरण केल्याचा दावा आयोजकांनी केला. मात्र, मल्लिकार्जुन खर्गे हे दलित समाजाचे असल्याने काँग्रेसने या विधीला तीव्र विरोध दर्शवला.

या घटनेनंतर राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. हा शुद्धीकरण विधी म्हणजे दलितविरोधी मानसिकतेचे लक्षण असून यामुळे दलितांच्या अस्मितेला ठेच पोहोचली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. राहुल गांधींच्या या भूमिकेवर आक्षेप घेत अमित कुमार यांनी पोलिसांत धाव घेतली. राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे अनुसूचित जातीच्या लोकांच्या भावना दुखावल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

या तक्रारीची दखल घेत हल्द्वानी पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 196 व 299 अन्वये तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा 1989 च्या कलम 3(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे उत्तराखंडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

Monday, 31 August 2026, 9:21

राहुल गांधीच्या अडचणीत वाढ !‘त्या’ वक्तव्यावरून वाद पेटला ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 9:21
Next Post

आता कार कशाला? 499 रुपयांत बुक करा थेट एअर टॅक्सी; नवी सुविधा सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp