Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 September 2026, 19:12

नागपूर: महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर सरकारकडून भर दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात आणखी तीन मोठे द्रुतगती महामार्ग उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर-गोंदिया, नागपूर-चंद्रपूर आणि भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्गांसह नवेगाव मोरे ते सुरजागड मार्गाच्या निधीला राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी तब्बल ४२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, पूर्व विदर्भात सुमारे ४६० किलोमीटरचे नवे महामार्ग जाळे विकसित होणार आहे.

या महामार्गांमुळे नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. हे जिल्हे हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीने जोडले जाणार असल्याने प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच गडचिरोलीतील कोनसारी आणि सूरजागड यांसारख्या भागांमध्ये रस्ते पोहोचल्याने लोहखनिजासह इतर उद्योग आणि वाहतुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हे मार्ग विदर्भातील प्रमुख केंद्रांना समृद्धी महामार्गाशी जोडण्याचे काम करणार असल्याने मुंबईशी संपर्कही वाढणार आहे.

नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गाची लांबी १६२ किलोमीटर असेल. नागपूरमधील गवसी मानपूर ते गोंदियातील सावरीदरम्यान ३+३ लेनचा हा महामार्ग प्रस्तावित आहे. या मार्गावर नऊ इंटरचेंज असतील. त्यासाठी १,६३४ हेक्टर जमिनीचे भूसंपादन आवश्यक आहे. या महामार्गामुळे नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे तीन जिल्हे जोडले जाणार आहेत.

नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्गाची लांबी २०४ किलोमीटर असेल. वर्धा जिल्ह्यातील सेलडोह ते चंद्रपूरमधील नवेगाव मोरे (घाटकुळ)दरम्यान हा महामार्ग उभारला जाणार आहे. २+२ लेनच्या या मार्गावर सात इंटरचेंज असतील. त्यासाठी २,१५९ हेक्टर जमिनीचे भूसंपादन आवश्यक असून, हा महामार्ग नागपूर आणि चंद्रपूरमधील नऊ तालुक्यांना जोडणार आहे.

 

भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग ९४ किलोमीटर लांबीचा असेल. भंडारा जिल्ह्यातील बोरगाव ते चंद्रपूर जिल्ह्यातील ऋणमोजनदरम्यान ३+३ लेनचा हा महामार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गावर सहा इंटरचेंज असतील. यासाठी १,१८५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन आवश्यक आहे. हा महामार्ग भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना जोडणार आहे.

दरम्यान, या मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र विशेष उद्देश वाहन अर्थात ‘एसपीव्ही’ (Special Purpose Vehicle) स्थापन करण्यात आले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12

पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सापडलं! भावड्यानं डायरेक्ट पत्ताच सांगितला; खाक्या दाखवताच तोंड उघडलं, नेमकं काय घडलं?

Tuesday, 6 October 2026, 20:06

पुण्यात भुतबाधेच्या नावाखाली तृतीयपंथी महिलेचे कपडे काढले; खिडकीला बांधून मिरचीची धुरा देत मारहाण; तृतीयपंथी गुरुसह चौघांवर गुन्हा

Tuesday, 6 October 2026, 19:53

‘थांब तुझ्या नवऱ्याला आपले फोटो पाठवतो’ विवाहितेचे ७०हुन अधिक अश्लील व्हिडिओ काढले; मैत्रीचा गैरफायदा घेत संबंध ठेवले अन् नकार देताच..

Tuesday, 6 October 2026, 19:44
Next Post

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय 'रासरंग' दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp