Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 6 October 2026, 20:12

पुणे: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीला महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचे दावे करण्यात आले होते. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे वेगळी असून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्यांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतच तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे.

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढण्याची भूमिका मांडली होती. मात्र, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये स्थानिक नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने मंगेश चिवटे यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने आले आहेत. याशिवाय भाजपचे बब्रुवाहन रोंगे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आबीटकर उपस्थित होते. त्यामुळे शिंदे गटाने या निवडणुकीत आपली ताकद लावण्याचे संकेत दिले आहेत. शिक्षक मतदारसंघाप्रमाणेच पदवीधर मतदारसंघातही महायुतीतील अंतर्गत नाराजी उघड झाली आहे.

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते, शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी ही भूमिका घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

माने यांनी पक्ष नेतृत्वावरही नाराजी व्यक्त केली. मागील निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला माघार घेण्याची विनंती केली होती आणि पुढील निवडणुकीत संधी देण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा त्यांनी केला. मात्र यंदा उमेदवारी न मिळाल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने या लढतीकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08

भाजपला मोठा धक्का! राज्यसभेची उमेदवारी हुकताच माजी खासदार धर्मेंद्र कश्यप नाराज; पक्ष सोडण्याचे संकेत

Wednesday, 7 October 2026, 19:04
Next Post

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp