Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 6 October 2026, 21:23

लोणी काळभोर, ता. 6 : देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करून परिसरात अवैध व्यवसायाला खतपाणी घालणाऱ्या सराईत गुन्हेगारावर लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. अक्षय वामन जाधव (वय २५, रा. नांदे पाटील वस्ती, सिद्राम मळा, लोणी काळभोर, ता. हवेली) याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून तब्बल दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

अक्षय जाधव याच्याविरुद्ध देशी-विदेशी दारूची विक्री तसेच इतर अवैध कृत्यांप्रकरणी यापूर्वी एकूण सात गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने आणि त्याच्या अवैध व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दारूच्या व्यसनाला प्रोत्साहन मिळून कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध तडीपारची कारवाई केली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे शहर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार अक्षय जाधव याला पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे.

दरम्यान, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणाऱ्या तसेच अशा अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा लोणी काळभोर पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, सहायक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे, अंकुश बोराटे, पोलीस हवालदार विलास शिंदे, स्वाती पिसाळ, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

KYC राहिलेल्या लाडक्या बहिणींनाही दिवाळी गिफ्ट! 81 लाख महिलांच्या 1500 रुपयांबाबत फडणवीस काय म्हणाले?

Friday, 30 October 2026, 16:14

१ जानेवारी २०२७ पासून १८ गाड्या धावणार नव्या क्रमांकाने; अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क पूर्णपणे बंद!

Friday, 30 October 2026, 16:05

मारहाणीचा कळस! सूर्यफूल तेल, अंतर्वस्त्र अन् अमानुष छळ; राम पूर्णेकरांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप

Friday, 30 October 2026, 15:33

शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद पेटला, टीकेनंतर संजय गायकवाडांची माघार! एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर नेमकं काय म्हणाले?

Friday, 30 October 2026, 15:17

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा धक्का! रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान रेल्वेत ‘ही’ सुविधा असणार पूर्णपणे बंद

Friday, 30 October 2026, 15:00

पत्नी चार घरची धुणीभांडी करायची, पतीच्या मनात संशयाचं भूत! थेट कोयत्याने हल्ला अन् घडली जन्माची अद्दल..;पुण्यात घडलं भयंकर

Friday, 30 October 2026, 14:56
Next Post

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp