Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूलचा खो-खो संघ तालुक्यात प्रथम

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 5 October 2025, 13:37
Loni Kalbhor News: The Kho-Kho team of Prithviraj Kapoor High School in Loni Kalbhor won first place in the taluka.

Photo-Social Media

लोणी काळभोर, ता. 5: ग्रामीण भाग असतानादेखील मागील 15 वर्षाच्या कालावधीत लोणी काळभोर (Loni Kalbhor News) (ता. हवेली) येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उत्युंग कामगिरी केलेली आहे. येथील विद्यार्थी कुस्ती, कबड्डी, खो-खो, वेटलिफ्टिंग, धावणे यांसह विविध स्पर्धांमध्ये चमकले असून जिल्ह्यात दबदबा निर्माण केला आहे. त्यातच आता पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमधील (Prithviraj Kapoor High School in Loni Kalbhor) 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्यावतीने लोणीकंद (ता. हवेली) येथील सुभद्राबाई रामचंद्र भूमकर कॉलेजमध्ये नुकत्याच तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत तालुक्यातील 50 हून अधिक शाळांनी सहभाग घेतला आहे.

हेही वाचा: लोणी काळभोर येथील पोलिस पाटलांना ऊसतोड करणाऱ्या भावांनी घातला 5 लाखांचा गंडा

या स्पर्धेत शाळेचे 17 व 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे संघ सहभागी झाले होते. पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा अंतिम सामना हा लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूल या संघासोबत झाला. हा सामना पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या खेळाडूंनी एक डाव व सात गुणांनी जिंकला. या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

दरम्यान, शाळेच्या 14 वर्ष वयोगटाचा, उपांत्य सामना ग्रामीण सर्वांगीण विकास शिक्षण संस्था कुंजीरवाडी या संघासोबत झाला. हा सामना सहा गुणांनी जिंकून 14 वर्षे वयोगटाच्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये धडक मारली होती. परंतु, या संघाला अंतिम सामन्यात उपविजेते पदकावर समाधान मानावे लागले.

विजेत्या खेळाडूंना क्रीडाशिक्षक सुरेश कोरे, राजेश चौरे आणि सुनील टिळेकर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले. यशस्वी खेळाडूंचे विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी, उपप्राचार्य व्ही एम. शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम आलेल्या खेळाडूंची नावे

आदेश पाटील, सोहम खामकर, रोहन खामकर, साहिल वडतीले, साई साळुंखे, सुनीत मोरे, प्रशांत खरात, ऋषिकेश साळुंखे, रुद्र तांदळे, आर्यन हालमे, आशुतोष लंगर, अरमान कोरबु, आर्यन तिकुडगे, कार्तिक खोचरे, संस्कार कोरे.

हेही वाचा: आमच्या मालकीच्या शेतजमिनीत थेऊर ग्रामपंचायतीचा अनधिकृत रस्ता?; जेष्ठ महिलेची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32
Next Post

लोणी स्टेशन येथील समृद्धी पॅलेसमधील फ्लॅटला अचानक लागली आग; 50 हजारांहून अधिक रुपयांचे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp