Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील पोलिस पाटलांना ऊसतोड करणाऱ्या भावांनी घातला 5 लाखांचा गंडा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 October 2025, 16:47

लोणी काळभोर : गुऱ्हाळाच्या व्यवसायासाठी 40 ते 50 ऊसतोड मजूर आणून देण्याचे आमिष दाखवून दोन चुलत भावांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पोलिस पाटलांची 5 लाख 22 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रानमळा परिसरात 2024 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालूसिंग पावरा (रा. तेलखडे, ता. धडगाव जि. नंदुरबार) व भाईदास पावरा (रा. तेलखडे ता.धडगाव, जि. नंदुरबार) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लक्ष्मण दशरथ काळभोर (दादा पाटील) (वय 59, रा. तरवडी, लोणीकाळभोर ता. हवेली, जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: रक्षकच बनले भक्षक..! फळ विक्रेत्या तरुणीला निर्जनस्थळी नेत पोलिसांनीच केला बलात्कार; नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लक्ष्मण काळभोर हे लोणी काळभोर गावाचे पोलीस पाटील असून ते कुटुंबासोबत रायवाडी परिसरात राहतात. त्यांचा कृष्णाई गुळ उद्योग समुह या नावाने गुऱ्हाळ व्यवसाय आहे. काळभोर यांच्याकडे कालु‌सिंग पावरा हा गुऱ्हाळावर ऑक्टोबर 2024 पासून काम करीत होता. एप्रील 2025 मध्ये कालुसिंग पावरा याने सांगीतले की, आमच्या गावाकडे ऊसतोड मजुर आहेत. व त्याचा चुलत भाऊ भाईदास पायरा हा टोळीचा मुकादम आहे. त्याच्याकडे ओळखीचे 40 ते 50 कामगार असून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना घेऊन येतो.

 

कालुसिंग पावरा हा काम करीत असल्याने काळभोर यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यानंतर तो कामगार आणण्यासाठी नंदुरबार गेला. गावाला गेल्यानंतर कालुसिंगने काळभोर यांना फोन करून सांगितले की, कामगार भेटले असून त्यांना 20 हजार रुपये अडवान्स पाठवून द्या. त्यानंतर काळभोर यांनी फोन पे वरून पहिल्यांदा 20 हजार व दुसऱ्यांदा 2 हजार रुपये पाठवून दिले.

दरम्यान, 10 मे 2025 रोजी कालुसिंग पावरा याचा काळभोर यांना पुन्हा फोन आला. 40 ते 50 कामगारांची जुळवाजुळव झाली आहे. कामगारांना उचल द्यावी लागेल, त्यासाठी 5 लाख रुपये रोख घेऊन या. कामगार मिळतील या आशेने काळभोर हे 5 लाख रुपये रक्कम घेवून नंदुरबार येथे गेले. पाटील यांनी कालुसिंग पावरा याच्यावर पुर्णपणे विश्वास ठेवून सदर रक्कम त्याच्याकडे सुपूर्द केली. काळभोर यांनी यावेळी रक्कम देताना मोबाईलमध्ये शुटींगदेखील केले आहे. त्यानंतर काळभोर हे घरी आले.

हेही वाचा: ‘तुझे हातपाय तोडल्याशिवाय तू शांत बसणार नाही’ शरद पवारांच्या शिलेदाराला जीवे मारण्याची धमकी

दोन दिवसानंतर काळभोर यांनी कालुसिंग पावरा याला फोन करून मजुरांच्या संदर्भात विचारणा केली असता, पावरा याने सांगितले की, लोकांची जुळवाजुळव झाली आहे. आम्ही दोन दिवसात सर्वजण येणार आहे. असे सांगितले परंतु ते कामासाठी आले नाहीत. याप्रकरणी लक्ष्मण काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात भारतीय न्याय सहिता अधिनियमन 316(2), 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.

हेही वाचा: Daund Crime: खडकी येथील लॉज नावालाच, आत वेगळेच काळे धंदे; पोलिसांनी धाड टाकली अन् ‘असा’ झाला वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश…  

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

iPhone 18 मध्ये भन्नाट फीचर्स! 48MP कॅमेरा, A20 Pro चिप अन् प्रीमियम क्वालिटीची अनेकांना भुरळ

Thursday, 10 September 2026, 12:14

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50
Next Post
Pranjal Khewalkar: The biggest twist in the Pranjal Khewalkar case; Forensic report erases the stigma on Khewalkar

Pranjal Khewalkar: प्रांजल खेवलकर प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक रिपोर्टने खेवलकरांवरील कलंक पुसला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp