Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 10 September 2026, 11:01

शिरूर: एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त प्राचार्याला मदत करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी इसमाने त्यांच्या एटीएम कार्डची चलाखीने अदलाबदल करून खात्यातून तब्बल ३८ हजार रुपये काढून घेतल्याची घटना शिरूर शहरात घडली.याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.८) सायंकाळी सुमारे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान करडे (ता.शिरूर) येथील रहिवासी व सेवानिवृत्त प्राचार्य तिरसींग लक्ष्मण पाचर्णे (वय ६६) हे बी.जे.कॉर्नरजवळील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते.

पाचर्णे हे एटीएममधून व्यवहार करीत असताना तेथे उपस्थित असलेल्या अंदाजे ३० ते ३२ वर्षे वयाच्या अनोळखी इसमाने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. “आपके पैसे कट हुये है, आपने एटीएम की स्लिप क्यों नहीं ली,रुको मैं आपको स्लिप निकालकर देता हूं,” असे सांगून त्या इसमाने पाचर्णे यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले व कार्डचा पिन नंबर विचारून घेतला.याच दरम्यान मदत करण्याच्या बहाण्याने त्याने पाचर्णे यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली.त्यानंतर त्यांच्या मूळ एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून ३८ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाचर्णे यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.त्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील आरोपी अनोळखी असून,त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.तसेच एटीएम परिसरातील उपलब्ध तांत्रिक माहिती व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीला लवकरच शोधण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.

 

एटीएममध्ये अनोळखी व्यक्ती मदतीच्या बहाण्याने कार्ड हातात घेत असल्यास नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी.कोणत्याही परिस्थितीत आपले एटीएम कार्ड, पिन किंवा बँक व्यवहाराची माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये.असे आवाहन शिरूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचा मोठा निर्णय! प्रथमेश देशमुखांच्या कुटुंबाला भेटणार, MPSC प्रकरणात सरकारविरोधात नवा डाव?

Thursday, 10 September 2026, 11:48

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

Thursday, 10 September 2026, 11:19

“एटीएम स्लिप काढून देतो” म्हणाला अन् कार्डच बदललं! शिरूरमध्ये सेवानिवृत्त प्राचार्याला ३८ हजारांचा गंडा

Thursday, 10 September 2026, 11:01

लोणी काळभोर-कदमवाकवस्तीत तीन घरफोड्या; साडेसात लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल लंपास

Thursday, 10 September 2026, 10:54

शिरूरमध्ये 2 दिवसांत 2 विवाहित महिला, 3 मुलं बेपत्ता; अपहरणाचा संशय, परिसरात खळबळ

Thursday, 10 September 2026, 10:50

दिशा सालियन प्रकरणात मोठी हालचाल! CBI तपासाला वेग; वडिलांचा जबाब ठरणार महत्त्वाचा?

Thursday, 10 September 2026, 10:44
Next Post

शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल! संपर्क प्रमुखांची यादी जाहीर; सरदेसाई-अंधारेंना मिळाली महत्त्वाची जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp