Loni Kalbhor News : लोणी काळभोर, ता.११ : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील धुमाळ मळा येथील मुक्ताई मेमोरिअल स्कूल या इंगजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या चंचल लालवाणी यांनी दिली आहे.
नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव
फुलगाव (ता. हवेली) येथे तालुकास्तरीत स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुक्ताई मेमोरिअल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी धावणे, चालणे, उंच उडी, गोळा फे ,भाला फेक, थाळी फेक या विविध खेळांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यालयाचा विद्यार्थी अंशुमन रवींद्र काकडे याने ५००० मिटर चालणे व श्रावणी लक्ष्मण गुड्डे हिने १०० मीटर हर्डल धावणे व लांब उडी या मैदानी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ज्ञानेश्वरी रामदास कुंजीर हिने ३००० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक, वैष्णवी नागनाथ धुमाळ हिने उंच उडी स्पर्धेत तृतीय, रितेश कुंजीर याने १०० मिटर धावणे या प्रकारात तृतीय क्रमांक ,सोहम हगवणे याने लांब उडी प्रकारात चतुर्थ क्रमांक, आर्या धुमाळ हिने भाला फेक या प्रकारात चतुर्थ क्रमांक मिळविला आहे. तर ४ × ४०० मीटर धावणे रिले या स्पर्धेत श्रावणी वलते ,शिवानी शीवरकर ,वैष्णवी शेळके,दिशा बडेकर, कार्तिकी कुंजीर,अक्षरा कुंजीर
यांनी चांगली कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अंशुमन काकडे ,श्रावणी गुड्डे व ज्ञानेश्वरी कुंजीर या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांची लांब उडी , ५००० मिटर चालणे , ३००० मिटर धावणे या स्पर्धेसाठीही जिल्हास्तरीय निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंना क्रिडाशिक्षक रविंद्र त्यागराजन व अमर गिरी यांचे मार्गदर्शन मिळाले.
यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र धुमाळ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्या चंचल लालवाणी, विकास धुमाळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजेते खेळाडू, क्रीडा शिक्षकांवर कौतुकांचा वर्षाव
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत मुक्ताई मेमोरिअल स्कूलच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे विजेते खेळाडू व क्रीडा शिक्षकांवर कुंजीरवाडी व परिसरातील नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.